पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अबदालीहि मराठ्यांचे अकटोविकट सैन्य पाहून भयभीत झाला होता. ह्यासंबंधाने ५ नोव्हेंबराला कोल्हापूर येथील जोशीराव यांचा पूर्वज कृष्ण जोशी संगमेश्वरकर लिहितो:" श्रीमंतांनी चोहोंकडे तोफखाना पसरला आहे. यवनास थोर भय झाले आहे. पुढे येवचत नाही. आमचे सैनिक यवनाचे समक्ष उभे राहून, नित्य शेपन्नास यवन मारून उंट घोडी आणितात. दोन हत्ती पेंढारी यांणी काल आणिले. यवनाच्या सैन्यांत महर्गता झाली आहे. आमच्या सैन्यांत सवंगाई आहे. आणखी दोन चार दिवसांत यवन चालोन तोफांवरी येईल तरी क्षणमात्र बडेल. न ये तर आमचे लोक जाऊन युद्ध करणार. सर्व सैन्यास उत्साह आहे की अबदाली व नजीबखान व सजाउद्दौला आता चौ दिवसांत क्षयास जातील. अबदाली शहानशाहा ह्मणवीत होता. त्याने युद्धे बहत केली आहेत. परंतु तो दो कोसांवरी येऊन, आठ दिवस बसोन, कांहीं पराक्रम होत नाही. यामुळे आमची फोज वहत शेर आहे. अबदालीने स्वदेशास जावे तरी मार्ग नाही. यद्ध करावें तरी परिणाम नाही. उगेंच बसावें तरी भक्षावयास नाही. याप्रमाणे विचारांत पडला आहे ( लेखांक २६५). " ह्याप्रमाणे अबदालीची दःस्थिति होती. तिचा पूर्णपणे नफा घेण्याचा सदाशिवरावाचा विचार होता. परंत, एका गोविंदपंताच्या कचराईमळे सर्व काही बिघडण्याच्या रंगास येण्याची चिन्हे दिसत होती. गोविंदपंताच्या कुचराईसंबंधाने नारो शकंर ७ नोव्हेंबराला लिहितो:- "दाजीबा ! आणीक सर्व कामें एकीकडे ठेवून, रात्रीचा दिवस करून दाखवावयाचा प्रसंग असतां, तुझा यावयास ढील करतां, यावरून काय ह्मणावें? पत्र पावतांच जेथें असाल तेयन कच करून दुमजला येऊन पोहाचणे. तमांपाशा दहा हजार फौज असेोन पंचवीस लाख रुपये खात असतां, खावंदास कामाची निकड असतां, तुह्मी लटके बहाणे करून मलखांत रहावें हे गोष्टी तमांस योग्य नाहीं ! खावंद वारंवार लिहितात, तुझी गढीकोटांचे बहाणे लिहितां, हा सेवकलोकांचा धर्म नव्हे ( लेखांक २४३).” भाऊसाहेबाने अवद.ली. पारिपत्य करण्याची आपल्याकडून होईल तितकी उत्तम तयारी केली होती. इभ्राईमखानाच्या तोफखान्याचा मजबूत आधार असल्यामळे भाऊनें स्वतः मोगलाई पद्धतीने लढण्याचा विचार केला व गोविदपंतास गनीमी त-हेनें शत्रस भंडावन सोडण्यास सागितले (लेखांक २६०,२४४, टीप ३१७ ). गोविंदपंताच्या गनीमी लढाईची वाट भाऊनें बरेच दिवस पाहिली व शेवटी १५ नोव्हेंबराला येणेप्रमाणे गोविंदपंतास लिहिले:“लिहिलेप्रमाणे एकहि काम होऊन न आलें. फार दिवस खावंदाने लहानाचे थोर केलें, वाढविले, त्याचे सार्थक केलें ! अजून तरी सावध होऊन लिहिलेप्रमाणे येऊन पोहोचणे” (लेखांक २६८). परंतु गोविंदपंत वेळेवर कसचा यऊन पोहोचतो ! त्याच्या मनांत भाऊचा पक्का अत बघावयाचा होता व त्याशिवाय त्याला दुसरें गत्यंतर नव्हते. आजपर्यंत केलेली सर्व पापें झांकण्याची सोय मराठयांवर काहीतरी भयंकर विपत्ति आल्यावांचून लागण्यासारखी नाही हे पंतमजकूर जाणन होता. तेव्हां भाऊला मदत न करण्याची व्यवस्था आपल्याकडून जेवढी होईल तेवढी हा इसम करून चकला. इकडे भाऊने मात्र आपली