पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८४ नोव्हेंबरच्या ४ थ्या तारखेला येणेप्रमाणे लिहिले:- " कार्यावरी आज्ञेप्रमाणे जातो, ऐशा गोष्टी रिकाम्या ( मात्र ) लिहितां. निदर्शनास यांतील एकहि येत नाही. यामुळे तुमच्या कर्तृत्वाची तारीफ वाटते ते कोठपर्यंत लिहावी ! लिहितां लिहितां भागलों ! हे तुमच्या कर्तृत्वास उत्तम नाही. अबदालीची आमची गांठ पागिपताजवळ पडली आहे. तोफखान्याच्या आराया रचून लढाई करावयास तयारी केली आहे. त्याच्याने इकडे तिकडे जावत नाही व कांहीं करवत नाही. पावणे दोन कोंस दीड कोंसाची तफावत आहे. पेंढारी व लुगारे राऊत वगैरे नित्य उंटें, घोडी, तट्टे, बैल आघाडीपिछाडीवरी जाऊन गोटापासून घेऊन येतात. त्यांचे कोणी पाठीवरहि निघत नाही. याप्रमाणे आहे. तुह्मीं पत्र पावतांच अंतर्वेदीतून पटपटगंजावरी यांच्या पिछाडीस यऊन पोहोंचणे. सावकास याल तरी ठीक नाही. लांबलांब मजलीने येणे, रसद त्याजकडे जावयाची भाढळेल ते लुटणे, दबाव पाडणे, ह्मणजे चहूंकडून घाबरा होईल. हेहि युक्त तुझांस बहुत वेळ लिहिली. परंतु तुमी येत नाही. सारीच डोळेझांक करतां. परंत असा समय चाकरी करून दाखवावयाचा पुढें कदापि येणें नाही. या हंगामी जो आपले शक्तीपेक्षा चाकरी अधीक करून दाखवील त्याचें रूप आहे. हे दूरंदेशी ध्यानात आणून सर्व गोष्टी लिहिल्याप्रमाणे करणे. ऐवज पाठवणे. तुह्मीं येणे. लहानसहान गढ्यामुळे गुंतोन मोठ्या कामाच्या उपयोगांतून जाल असे करून न घेणे. तुह्मी दरमजल बागपतचे सुमारे अंतर्वेदीतून येऊन रसद मारणे. नजीबखानाचा मुलख जाळून लुटून फस्त करणे. दोन चार हजार चांगली निवडक फौज लांब लांब मजली करून लिाहलप्रमाणे रोहिलियांच्या मुलखांत दंगा करणे व रसद बंद करणे. कांहींच न झाले तरी परिछिन्न तुह्मांवर शब्द येईल. वारंवार लिहावयाची, आपले अवरूची ईरे धरून काम वजावून आणणे. या दिवसांत तुह्मीं येऊन लिहिलेप्रमाणे पावला असता तर किती काम होतं. अजून तरी करून दाखवणे..गंगापार जमीदारांकडन दंगा करवणे, गोपाळराव गणेश फौजसुद्धां गंगापार उतरून जमीदार सामील करून सुजादौला, रोहिले यांचा अंमल उठवावा. याप्रमाणे करणं. मसलत मोठी. या दिवसांत ज्यास जे लिहावें त्याप्रमाणे होऊन न येई मग तुह्मी आमचे कामाचे काय ? य उपरि आज्ञेची व चाकरी करून दाखयावयाची सीमा झाली ! " याप्रमाणे टोंचन व खोंचन लिहन गाविदपताचा कानउघाडणी सदाशिवरावाने केली ( लेखांक २६४). नारो शंकराने नोव्हेंबरच्या ३ या तारखेस अशाच अर्थाचें एक पत्र गोविंदपंतास लिहिले (लेखांक २६३). तरीहि गोविंदपंताने आपला दिरंगाईचा व सस्तपणाचा क्रम सोडिला नाही. अबदालीचे पूर्णपणे पारिपत्य करण्याची ही तर ऐन वेळ होती. सदाशिवरावाने मुद्दाम उत्तरेकडे कंजपुऱ्यास जाऊन अबदालीला दिल्ली येथील सैन्याच्या व आपल्या पानिपतयेथील सैन्याच्या मध्ये धरिलें होतें. अबदालीला समूळ चीत करण्यास २५ अक्टोबरपासून १५ नोव्हेंबरपर्यंत उत्तम संधि होती. ह्या अवधीत अबदालीच्या लष्करांत अत्यंत महर्गता होती; मराठ्यांनी २ नोव्हेंबराला अबदालीचा सामान्यसा पाडाव केला होता व