पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देण्यांतच खरा पराक्रम आहे; वगैरे सूचना गोविंदपंताला कित्येकांनी केल्या. परंतु, किरकोळ गढ्या घेतल्याशिवाय अव्वल काम हाती घेता येत नाही ह्या सवीवर अबदालीला शह देण्याचें गोविंदपंताने नाकारिलें ( लेखांक २५०). त्यामुळे अवदालीच्या सैन्यांत दाणावैरणीची टंचाई मळीच भासली नाही. अबदालीचा मार्ग भाऊनें कुंजपुऱ्यास अडविल्यामुळे अबदाली अंतर्वेदीत कोंडला गेला होता. फक्त रसद बंद करून त्याला घाबरा करण्याचे तेवढे राहिले होते. एवढें काम जरूर करावे ह्मणून गोविंदपंताला सदाशिवरावाचा सक्त हुकूम होता. ह्या हुकमाप्रमाणे गोविंदपंतानें अबदालीच्या पिछाडीस दंगा केला असता ह्मणजे अबदाली समूळ बुडाला असता. अबदाली २३ अक्टोबरपासून २५ अक्टोबरपर्यंत बागपताजवळ यमुना उतरत होता, त्यावेळी त्याच्या पाठीवर जर पंतान शह दिला असता तर मोठे काम होऊन येते. परंतु, अबदालीला गोविंदपंताच्या हातून यत्किचि हि उपसर्ग लागेना ( लेखांक २६० ). अबदाली यमुना उतरून बागपत गणोरावरून संभाजकियास आला तेव्हां भाऊनें गोविंदपताला अबदालीची रसद मारण्यास पुन्हां हुकूम केला. " तुह्मीं जलदीने यमुनेपलीकडून येऊन बागपतेपर्यंत धुमामा चालवून अबदालीसः रसद न पोहोंचे, फौजेस शह पडे, ऐसें करावें. गिलच्यांचा पेच तिकडे नाही. यास्तव लांब लांब मजलींनी येणे. या कामास दिरंग न लावणे.हे कान मागेंच करावें ऐसे होते. याउपरि तपशील न लावणे. गडमुक्तेश्वर, शामळी वगैरे नजीबखानाचे प्रांत जाळावे. अबदालीस मागें रसद बंद होऊन. मुलकाचा बोभाट होय असें जरूर करणे. वारंवार लिहिले जाऊन अजून तुह्मी उमरगडोंच आहां हे अपूर्व आहे ! आतांहि लिहिलेप्रमाणे न झाले तरी मर्दमीचे काम होत नाहींसेंच झालें ! ईरे धरून तडकून येऊन काम करणे." ह्य प्रमाणे सदाशिवरावाने गोविंदपंताला नोव्हेंबराच्या पहिल्या तारखेस लिहिलें ( लेखांक. १६.१). यावेळी भाऊच्या व अबदालीच्या सैन्यांमध्ये अंतर दोन चार कोसांचे होते. मराठ्यांचे भय अबदालीला इतके पडले होते. की, तो फार बाताबेतानें हालचाल करीत होता. चाळीस कोस पंनास कोंस धावून जाण्याची हिंमत अबदालीच्या अंगी राहिली नव्हती, यमुनेच्या अलीकडे आल्याकारणाने ह्यावेळी. अबदालीच्या लष्करांत. महागाई फार झाली. (टीप ३२१ ). ती गोविंदपंताच्या पराक्रमाने झाली नसून यमनेच्या पाण्यामळे झाली होती. सारांश, अबदालीची हलाकी ह्यावेळी फार झाली होती. याच सुमाराला अबदालीचे व मराठ्यांचें एक युद्ध झाले. त्यांत मराठी फौज विजयी झाली (लेखांक २६२). यवनांचे पारिपत्य करण्याचा हुरूप ह्यावेळी सदाशिवरावाच्या व मराठी सैन्याच्या अंगांत अतोनात भरला होता व तो दोन्ही सैन्यांची एकंदर परिस्थिति पाहतां सर्वथैव रास्त होता. अबदालीला आपण खास गिळणार अशी सदाशिवरावभाऊला पूर्ण खात्री वाटत होती (लेखांक २६१ ). ही खात्री खरी ठरण्यास एक गोष्ट मात्र होणे जरूर होते. ती गोष्ट ही की, गोविंदपंतानें अंतर्वेदीच्या व. रोहिलखंडाच्या बाजूने अबदालीची रसद बंद केली पाहिजे होती. ह्यासंबंधानें सदाशिवरावाने गोविंदपंताला