पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोस्त केल्यामुळे व तेथून अबदालीचे तोंड दाविल्यामुळे अंतर्वेदीतून कोठून तरी बाहेर पडणें अबदालीला जरूर होतें. कुंजपुन्याच्या बाजूचे सर्व घाट मराठ्यांनी धरल्याकारणाने तिकडच्या बाजूला कुच करण्याची अबदालीची सोय नव्हती. दिल्लीस नारो शंकर व सबळगडास सुरजमल जाट असल्यामुळे आणि शिकोराबाद, इटावें, आग्रा वगैरे यमुनेच्या अलीकडील व पलीकडील ठाणी मराठ्यांच्या ताब्यात असल्याकारणाने दिल्लीच्या दक्षिणेसहि अबदालीचा पाड लागण्यासारखा नव्हता. दिल्लीपासून कुंजपुऱ्यापर्यंतचेहि यमुनेचे सर्व घाट मराठ्यांच्या हातांत होते. त्यांतल्या त्यांत पानिपतापर्यंत भाऊचा दवाव विशेष होता. पानिपताच्या अलीकडे संभाळकियापासून बागपताच्या पलीकडे काही कोसपर्यंत मराठ्यांची लहान लहान ठाणी होती. त्यांपैकी एखादें फोडल्याशिवाय यमुनेच्या अलीकडे येणें अबदालीला शक्य नव्हते. भाऊच्या भीतीमुळे अंतर्वेदीत राहणें तर त्याला अत्यंत धोक्याचे होते. तेव्हां बागपताजवळ मोठ्या कष्टानें अबदाली यमुना उतरला व मोठ्या सावधगिरीने पानिपताचा त्याने रोख धरिला. ह्यावेळी अबदाली सदाशिवरावाच्या कचाटींत चांगला सांपडला होता. तोंडावर सदाशिवरावभाऊची सर्वप्रकारे सज्ज झालेली फाज पानिपतास उभी होती व पाठीमागें दिल्लीस नारो शंकर सहा सात हजार लोकांनिशा अबदालीला पायबंद देण्यास तयार होता. यमुनेच्या उजव्या तीराला अबदालीला मराठ्यांनी ह्याप्रमाणे अगदी बतंग करून टाकिले होते. एक बाजू मात्र अबदालीला मोकळी राहिली होती. ती वाज यमुनेच्या पलीकडील नजीबखानाच्या ताब्यांतील अतवेद व रोहिलखंड हे प्रांत होत. ह्या प्रांतांतून अबदालीला पायबंद देण्याचे काम सदाशिवरावभाऊनें गोविंदपंताकडे सोपविले होते. त्याने तें काम कसें बजाविले ते पाहूं. । अबदाली बागपतास यमुना उतरेतोपर्यंत ह्मणजे २५ अक्टोबरपर्यंत यवनांचे सैन्य दिल्लीसमोर शिकंदन्यापासून मिरतापर्यंत पसरले होते. त्यांना दाणागल्ला वगैरे रसद भोवतालच्या प्रांतांतून व रोहिलखंडांतून मिळत असे ती लागभाग पाहून मारण्याचे काम गोविंदपंताचे होते. तसेंच नजीबखान व सुजाउद्दौला ह्यांच्या प्रांतांतील ठाणी घेण्याचे व तेथें दंगा माजवून ह्या दोघां यवनसरदारांची चितें व्यग्र करण्याचे काम गोविंदपंतावर सोपविलेले होते. जाटाचे लोक सकुराबादेस बसले होते त्यांना मदतीस घेऊन ही कामें जरूर करावी, झणजे फार उपयोग आहे ह्मणून सदाशिवराव गोविंदपंताला एकसारिखें लिहीत होता ( लेखांक २४४ ). ह्यावेळी अबदालीची रसद बंद करणे हे अत्यंत महत्त्वाचे व जरूरीचे काम होते. गोविंदपंताने हे काम टाकून निराजेंच एक काम करण्याचा डौल घातला. तालगांव, तिरव, कनोज, खेरनगर, भुजाजंग, खतलाख, मोहना, बरगांव, गलोली वगैरे बिठुराकडील लहान सहान गढ्या घेत बसून अंतर्वेदीतील यवनांच्या सैन्याला शह देण्याच्या जरूरीच्या कामी गोविंदपंतानें पूर्ण हयगय केली ( लेखांक २५८ ). किरकोळ गढ्या घेत बसून महिन्यांचे महिने व्यर्थ दवडण्यांत व मुख्य कामाला अडथळा आणण्यांत मतलब नाहीं; ताबडतोब भाऊसाहेबांच्या मदतीला जाऊन अबदालीला शह