पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केली. रसद बंद होऊन अंतर्वेदीत अबदालीला फाके पडू लागले ह्मणजे तो तडफडून यमनेच्या अलीकडे येईल किंवा गोविंदपंताच्या अंगावर उलटून जाईल अशी भाऊची अटकळ होती. भाऊ कुंजपुऱ्याकडे गेल्यामुळे फारकरून तो कुंजपुन्याच्या दिशेनेच कच करील असा भाऊचा तर्क होता. तो कुंजपु-याकडे आला तर गोविंदपंतानें त्याच्या पाठोपाठ येऊन मागील व भोवतालचा मुलूख वैराण करावा व त्याची रसद मारावी अशी भाऊची इच्छा होती. तो गोविंदपंतावर उलटून धावून गेला तर सदाशिवराव यमुना उतरून त्याच्या पाठीवर चालून जाण्यास तयार होता. येणेप्रमाणे अबदालीला दोहींकडून बतंग करून पिसाळवून सोडावयाचा भाऊचा इरादा होता व ह्या कामी गोविंदपंतानें नेटानें व उत्साहाने मेहनत करावी अशी भाऊची विनवणी होती. ह्यावेळी मोहिमेची सर्व गुरुकिल्ली गोविंदपंताच्या हातांत होती. रान उठवून व अडवून शिकार सदाशिवरावाच्या हातांत बिनचूक आणून सोडण्याचे काम गोविंदपंताचे होते. सारांश, ह्या मोहिमेंत जयापजय येणें सर्वथा गोविंदपंताच्या हुशारीवर व चलाखीवर अवलंबून होतें. भाऊ दिल्लीहून निघाले ते १५ अक्टोबराच्या सुमाराला कुंजपुयास आले. हे स्थल फार मजबूत असून नाकेबंदीचे होते. आंत समतखान ह्मणून अबदालीचा सरदार पांच सात हजार फौजेसुद्धा होता. कुंजपुयाची गढी सोडून डावाडोल होऊन मराठ्यांच्या सैन्याला दमवावयाचा समतखानाचा विचार होता. मराठ्यांच्या सैन्याला अंगावर घेऊन आपण पळत सुटावें व अबदालीने पाठीमागून येऊन मराट्यांना कचाटींत धरावें अशी समतखानाची योजना होती (लेखांक २५८ ). परंतु, बळवंतराव मेहेंदळे व जनकोजी शिंदे यांनी त्वरा करून गढीभोंवतीं वेढा घातल्यामळे व समतखानाची दोन हजार फौज बाहेर पळून जात होती ती वाटेतच लुटल्यामुळे (लेखांक २५५ ) ही समतखानाची योजना जागच्या जागींच जिरली. सदाशिवराव आल्यावर मराठयांनी कुंजपुरा १७ अक्टोवराला घेतला व आंतील पांच सहा हजार प्यादा लुटला (टीप ३१६). कुंजपुरा घेतल्यावर भाऊच्या मनांत पूर्वी ठरल्याप्रमाणे सारंगपूरच्या घाटानें यमुना उतरून अबदालीवर जावयाचे होते. त्याप्रमाणे यमुना उतरण्याकरितां सदाशिवरावाने कुंजपुन्याच्या उत्तरेस कुच करण्याचा घाट घातला; तो अशी बातमी आली की अबदाली बागपताजवळ यमुना उतरून अलीकडे दक्षिणतीराला आला. ह्या वेळच्या अवदालीच्या व सदाशिवरावाच्या हालचाली वाचकांच्या स्पष्ट ध्यानांत याव्या ह्मणून दिल्लीपासून कुंजपुऱ्यापर्यंतच्या कांहीं गांवांची अंतरे देणे जरूर आहे. दिल्लीपासून उत्तरेस यमुनेच्या तीरी बागपत २० मैल, सोनपत २६ मैल, गणोर ३६ मैल, संभाळकिया ४५ मैल, पानिपत ५४ मैल व कुंजपुरा ७८ मैल आहे. अददाली बागपतास अक्टोबरच्या २५ तारखेला उतरला व २८ अक्टोबरास गणोरावरून संभाळकियास येऊन पानिपताच्या रोखाने तीन कोस पुढे आला. ह्याच सुमाराला भाऊ कुंजपुयाहून निघून पानिपतास अबदालीच्या समोर येऊन पोहोंचला ( लेखांक २६१). भाऊनें कुंजपुरा घेऊन समतखानाला जमीन