पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कांस बळकट धरिली. १० अक्टोबर १७६० पासून अबदाली, नजीबखान व सुजा. उद्दौला मराठ्यांच्या विरुद्ध एकसूत्राने चालू लागले. दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांच्या मनात विश्वासरावाला बसवावयाचे आहे वगैरे ज्या बाजारगप्पा त्यावेळी चोहोकडे पसरल्या होत्या त्याहि अलीगोहराला पातशाहा करून सदाशिवरावाने जागच्या जागी बसवून टाकिल्या. चकत्याच्या कुळांतील कोणी तरी औग्स पुरुष दिल्लीच्या तख्तावर बसवावयाचा व त्याची चजिरी आपण स्वतः करावयाची असा भाऊचा ह्यावेळी बेत होता. सातारच्या छत्रपतीची पेशवाई करून पेशव्यांनी महाराष्ट्रांतील सर्व सत्ता जशी आपल्या हातांत घेतली तशीच दिल्लीच्या पातशाहाची वजिरी करून सर्व हिंदुस्थानची सत्ता कायदेशीर रीतीनें, विशेष बोभाट न होतां व लोकांची मने न दुखवितां मिळवावयाची असा सदाशिवरावाचा विचार होता. हा हेतु यवनांच्या ध्यानांत आल्याबरोबर ते आपले पूर्वीचे तंटे विसरले व एकजुटीने मराठ्यांशी सामना करण्यास सिद्ध झाले. इकडे सदाशिवरावभाऊनेंहि ज्या ज्या योजना करावयाच्या त्या त्या केल्या. यमनेच्या दक्षिणतीराला कुंजपु-यास अबदालीचा समदखान ह्मणून कोणी सरदार सुमारे वर्षभर पांच सहा हजार सैन्यासह ठाणे देऊन बसला होता. पश्चिमोत्तरेकडून यमुना उतरून अंतर्वेदीत अबदालीच्या अंगावर जावयाला किंवा त्या बाजने अबदालीला बाहेर काढावयाला स्थल पटलें झणजे हे कंजपुरच होते. हे स्थल घेऊन सारंगपरास यमुना उतरून अंतर्वेदीत शिरण्यास मार्ग हाता ( लेखांक २५८). तेव्हां कुंजपु-याकडे सदाशिवरावाने बळवंतराव मेहेंदळ्यास व सरदारांस पाठवून दिले व स्वतः आपण त्यांच्या पाठीमागून त्याच रोखाने चालला. अबदालीला उजवी स्वतः घालण्याचा विचार करून डावीकडून त्याला शह देण्यास भाऊनें गोविंदपंतास हुकूम केला. भाऊनें गोविंदपंत ला कामगिरी मोठी महत्त्वाची सांगितली होती. अबदाली, नजीबखान, सुजाउद्दौला शिकंदयावर गोळा झाले होते. भाऊ दिल्लीवरून यमुनेच्या दक्षिणतीराने जसजसा उत्तरेस जाऊं लागला तसतसा अबदालीहि यमुनेच्या उत्तर तीराने कुंजपु-याकडे रोख करून चालला. कुंजपुयास जाऊन आपले तोंड धरून ठेवावयाचा भाऊचा बेत आहे हे अबदाली समजला. तेव्हां अबदालीच्या उत्तरेकडच्या गतीला प्रतिरोध करावा ह्मणून गोविद ताला भाऊनें खालील कामगिऱ्या पर्वीप्रमाणे पुन्हां सांगितल्या.गोविंदपंतानें सोरमच्या घाटीं गंगा उतरून रोहिलखंडांत जाण्याची अवाई घालावी; कोळजळेश्वराच्या बाजूने येऊन अबदालीच्या पाठीमागें पायबंद द्यावा; अंतर्वेद, रोहिलखंड व सुजाउद्दौल्याचा प्रांत ह्या प्रदेशांतील गावें. खेडी, शहरें शेने लुटावी, जाळावी व पोळून फस्त करावी; व तेथील जमीदार व गडकरी ह्यांच्याकडून दंगा करवाया; ह्या इतक्या कामगिया अवश्य व ताबडतोब गोविंदपंताने कराव्या असा भाऊचा हुकूम होता. सर्वात अबदालीच्या पाठीमागचा मुलूख वैराण करून, अबदालीला रसद पोहोंचं देऊ नये अशी भाऊची साग्रह व सोत्कंठ गोविंदपंताला विनवणी होती. किरकोळ गढया घेत बसून व्यर्थ काल हरण करूं नये अशीहि सूचना भाऊने पंताला