पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बरीच कामे उरकावयाची होती. अबदाली, नजीबखान, सुजाउद्दौला यांच्याशी तहाची बोलणी भाऊने येथूनच चालविली; अबदालीच्या सैन्यांत फुटफाट करण्याचे राजकारण येथूनच रचिलें. व दिल्लीच्या पातशाहीची व्यवस्थाहि येथेच राहून केली. अलमगीर पातशाहाचे सत्र आंतन अबदालीकडे आहे असे समजून आल्यावरून १७५९ च्या नोव्हेंबरांत गाजुद्दिन वजिराने त्याला ठार मारिलें व त्याच्या जागी कामवक्षाचा पुत्र शहाजहान यास पातशाहा केलें. ह्या शहाजहानाचें राज्य, ह्मणींतल्या प्रमाण, औट घटकेचेच होते. १७६० च्या जानेवारीत अबदालीने दिल्ली घेतली त्यावेळी ह्या राजांचें राज्य संपले. त्या वेळेपासून सदाशिवरावाने दिल्ली आगस्टांत घेतली, तोपर्यंत तख्तावर कोणी पातशाहा नव्हता. अलमगिराचा पुत्र अलीगोहर हा भिऊन १७५९ च्या नोव्हेंबरांत जो पट्टण्यास पळून गेला तो इकडे पुन्हां परत येईना. अबदालीने व सदाशिवरावभाऊनें दोघांनीहि त्याला बोलावणी पाठविली; परंतु, कोणाकडेहि येण्याची आपली खुषी नाही असे त्याने साफ कळविले. पुढे भाऊनें जेव्हां दिल्ली घेतली त्यावेळी त्याने मराठ्यांच्या बाजूला येण्याचा कल दाखविला. मराठ्यांचा वकील शिऊभट त्यावेळी अलीगोहरापाशी होता ( लेखांक २२७ ). ह्या वकिलाच्या उपदेशाने अलीगोहर मराठयांच्या बाजूला आला; परंतु, लढाईचा कायमचा निकाल झाल्यावांचन आपली दिल्लीस येण्याची खुपी नाहीं असें त्याने कळविलें ( लेखांक २१९ ), व आपला पुत्र जवानबख्त यास भाऊकडे पाठवून दिले. ह्या जवानबख्ताला सदाशिवरावभाऊने नाना पुरंधरे व आप्पाजी जाधवराव यांच्या हस्ते १० अक्टोबर १७६० रोजी वलीहद केलें व अलीगोहराला शहाअलम : नांव देऊन त्याच्या नांवचे गजशिक्के चालविले ( लेखांक २५८ व २५९ ). दिल्लीच्या तमाम लोकांनी नजरा केल्या व सर्वत्र खुशहाली झाली. सुजाउद्दौला व नजीबखान ह्यांच्या मनांत अबदालीला पातशाहा करावयाचें होतें व वजीरी, बक्षीगिरी आपसांत वाटून घ्यावयाची होती (लेखांक २३६ ). बाबरशहा चकते याने स्थापिलेल्या तैमुरियाच्या पातशाहीविषयी त्या दोघांच्या मनांत यत्किंचित्हि भक्ति नव्हती. नजीबखान व सुजाउद्दौला दिल्लीच्या पातशाहीच्या संरक्षणार्थ भांडत नव्हते. मराठ्यांशी लढण्यांत त्यांचा मुख्य हेतु आपापल्या जहागिरी जतन कराव्या व पातशाहीत हवा तसा धांगडधिंगा घालता यावा, हा होता. अबदालीच्या हातांत दिल्लीशहर दहा महिने होते; परंतु, त्याने दिल्लीच्या तख्तावर चकत्यांच्या कुळांतील कोणी पातशाहा मुद्दाम बसविला नाही. स्वतःला पातशाही मिळाली तर पहा ह्या हेतूनें अबदालीने तख्त रिकामें ठेविले. परंतु, अबदालीचा हा हेतु अलीगोहराला पातशाहा करून सदाशिवरावाने समूळ विध्वंसून टाकिला. सुजाउदौल्याची वजिरी मिळविण्याची व नजीबखानाची बक्षीगिरी पटकावण्याची आशाहि सदाशिवरावाच्या ह्या कृत्याने विफल झाली. आगष्टपासून अक्टोबरपर्यंत सुजाउद्दौला मराठ्यांशी सलूख करण्याच्या मिळमिळीत गोष्टी बोलत होता; व अबदालीला सोडून जाण्याचाहि आस्ते आस्ते त्याचा विचार होत चालला होता; परंतु, तो विचार त्याने आतां सोडून दिला आणि अबदालीची व नजीबखानाची