पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उतरून अंतर्वेदीत शिरण्याचा बेत तडीस नेण्याचा प्रयत्न केला. अबदालीवर चालून जाण्याचा हा पहिला बूट होता. अबदालांचें कांहीं सैन्य पूर्वेस अनुपशहराकडे होते व कांहीं सैन्य नजीबखान व जहानखान यांच्याबरोबर सुजाउद्दौल्याकडे विठुरास गेलें होतें; तेव्हां अबदाली व नजीबखान प्रत्येकी भाऊपेक्षां बलाने कमी होता हे स्पष्ट होते; तेव्हां ह्या वेळी अकस्मात् मध्ये उतरून अबदालीचें पारपत्य करण्याचा जो भाऊनें बूट काढिला होता तो सर्वोत्कृष्ट होता ह्यांत संशय नाही. हा बूट सिद्धीस नेण्याकरितां सदाशिवरावाने तीन हजार जाट व मानाजी पायगुडे वगैरे सरकारी पथके यमुनेच्या पलीकडे पाठवून सकुराबादेस मराठयांचे ठाणे बसविले. इतक्यांत सुजाउद्दौला व नजीरखान हे अबदालीकडे अनुपशहरास जात आहेत असे कळले. खरें मटले असतां गोविंदपंताने ह्या दोघांना मध्येच वाटत अडवून ठेवावयाचें परंतु गोविंदपताच्या ह्यावेळच्या सर्व हालचाली हयगयीच्या, चुकारपणाच्या व दिरंगाईच्या होत्या. त्याने सुजाउद्दौल्याला सुरक्षितपणे जाऊन दिले इतकेच नव्हे, तर यमुनेच्या दक्षिणतीराला नावा जमवून ठेवावयाच्या त्याहि वेळेवर जमविल्या नाहीत. १२ जुलैला सरदार, जाट व सदाशिवरावभाऊ आग्रयाला आले त्या वेळी यमुना उतरून पलीकडे अंतवदीत जातां येणे अशक्य आहे अशी त्यांची खात्री झाली. सुजाउद्दौला व नजीबखान जे निसटून गेले ते थेट अबदालीला शिकंद-यास जाऊन भेटले. गोविंदपंताच्या हयगयीमुळे व गैदीपणामुळे सदाशिवरावभाऊच्या हातची ही पहिली शिकार गेली. भाऊच्या मनांत स्वदेश पाठीशी घालून अबदालीला यमुनेत रेटून बुडवावयाचे होते; परंतु ते ह्यावेळी साधलें नाहीं. - सुजाउद्दौल्याशी राजकारण न करण्यांत व नजीबखानाला न अडविण्यांत गोविंदपंताचें वर्तन फारच गैरफायद्याचे झाले. गोविंदपंताचे इतर बाबीसंबंधानेंहि वर्तन असेंच तोट्याचे होते. पंचवीस लाख रुपयांचा भरणा स्वारी हिंदुस्थानांत आली ह्मणजे ताबडतोब करण्याबद्दल गोविंदपंताला सदाशिवरावाने पडदुराहून लिहिले होते. परंतु, तेंहि काम त्याने अद्यापर्यंत बजाविलें नाही. गारा पडून देशाची धूळधाण झाली; यवनांच्या येण्यामुळे रयत लावणीसंचणी करीत नाहीं; बंदेलखंडांतील व अंतर्वेदीतील संस्थानिक बडे करून पैसा देत नाहीत वगैरे सबबी सांगून सदाशिवरावाला वाटेस लावण्याचा त्याचा इरादा होता. खरें झटलें असतां, बुंदेलखंडांत व गोविंदपंताच्या ताब्यांतील अंतर्वेदीतील कडाकुरा वगैरे प्रांतांत यवनांचा कांहींच दंगा नव्हता (लेखांक २३९). अद्यापपर्यंत संस्थानिकांनीहि फारशी कोठे बंडे केली नव्हती. रतनसा, हिंदुपति ह्यांनी बंडे केली त्यांना गोविंदपताचीच फूस होती ( लेखांक २१६ ). सारांश, गोविंदपंताच्या ह्या सबबींत कांहींच तथ्य नव्हतें. यदाकदाचित् दैवी मानवी आपत्तींनी गोविंदपंताच्या प्रांतांचे उत्पन्न बुडालें होतें, अशी कल्पना केली तत्रापि मातब्बर मामलतदार ह्मणून गोविंदपंताची पत फार मोठी होती: त्याने आजपर्यंत पैसाहि चांगला कमविला होता व हिंदुस्थानांत सरकारस्वारी आल्यास पैशाची होईल तितकी मदत करूं वगैरे आश्वासने त्याने पेशव्यांना १७५७ त दिली होती