पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ण्याचा क्रम ठेविला; परंतु, गोविंदपंताच्या प्रांतांतून नजीबखान व जहानखान जेव्हां विठूरास आले तेव्हां तो त्यांना भेटण्यास गंगा उतरून आला ( लेखांक १९९). त्यावेळी मराठ्यांचा वकील शामजी रंगनाथ सुजापाशी होता. त्याच्या हस्ते सदाशिवरावाला त्याने लिहून पाठविले की, गोविंदपंतानें इटावें प्रांतांत नजीबखानाला येऊ दिले नसते व त्या प्रांतांतील ठाणी कायम राखून ठेविली असती ह्मणजे अर्थात् नजीबखान इकडे आलाहि नसता व आपल्याला त्यांना भेटणेहि जरूर न पडतें (लेखांक २०५). ह्याच पत्रांत त्याने आणखी असेंहि कळविले की, जर गोविंदपंत इटाव प्रांतांत पुन्हा अंमल बसवील तर आपण फौजेसुद्धा त्याच्या साहाय्याला येऊ व नंतर गोविंदपंतासह जहानखान व नजीबखान यांजवर चाल करून जाऊं. परंतु गोविंदपंताच्या हातून हे पुन्हां अंमल बसविण्याचे काम त्या वेळी झाले नाही. त्याने सदाशिवरावभाऊला आपल्या मदतीला सैन्य पाठवून देण्याची विनंति केली; परंतु, गोविंदपंताच्या मदतीला सैन्य पाठविण्याची ह्यावेळी भाऊची सोय नव्हती. तो व गोविंदपंताचा प्रांत यांजमध्ये दोन पूर आलेल्या नद्या वहात होत्या. शिवाय सरदारांना भेटून त्यांची सल्ला घेतल्यावांचून सैन्याची फोडाफोड करावी हेंहि त्याला योग्य वाटेना. ह्याजवर गोविंदपंतानें असें लिहून पाठविलें की, आपण जवळ आल्याखेरीज सुजाउद्दौल्याला मराठ्यांना येऊन मिळण्याचे धैर्य होत नाही; तेव्हां आपण जलद आग्रयाजवळ येऊन पोहोचावें; ह्मणजे दहशत पडून जहानखान व नजीबखान इटाव्या प्रांतांतून परत अबदालीकडे जातील व सुजाउद्दौला एकटाच राहून आपल्याला येऊन सामील होईल, हैं ह्मणणे पसंत पडून सदाशिवराव बहुत जलदी करून गंभीर नदीच्या तीरी येऊन पोहोंचला. तेथे त्याला अशी बातमी कळली की नजीबखानाच्या उपदेशावरून सजाउद्दौला अबदालीकडे जाणार व मराठ्यांना यऊन मिळण्याचा त्याचा विचार नाही. तेव्हां त्याने असा बेत केला की, सरदार, जाट व आपण आग्रयाला जाऊन यमुना उतरून नजीबखान व अबदाली ह्यांच्यामध्ये उतरावें व दोघांचेंहि निरनिराळ्या दिशेने पारपत्य करावें. अबदाली ह्यावेळी अनुपशहरों होता, नजीबखान व सुजाउद्दौला विठुरास होते व गोविंदपंत त्या दोघांच्यामध्ये इटाव्याजवळ होता. अबदालीजवळ तीस हजार फौज, नजीबखान व सुजाउद्दौला ह्यांजवळ वीस हजार फौज व गोविंदपंताजवळ सरासरी आठ दहा हजार फौज होती. आग्रयाजवळ यमुना उतरून पश्चिमेकडून गोविंदपंताला मिळता घेऊन प्रथम नजीबखान, जहानखान व सुजाउद्दौला ह्यांचे पारपत्य करावे व नंतर अबदालीची खोड मोडावी असा भाऊचा बेत होता. ह्याकरितां त्याने गोविंदपंताला आपल्या प्रांतांतील सर्व नावा यमनेच्या दक्षिणतीरी सुरक्षित आणून जमवून ठेवावयाला सांगितले व आपण गंभीर नदी उतरून सरदारांना ६ जुलैला त्यांनी सांगितले त्या रस्त्याने जाऊन मिळाला. सुजाउद्दौला नजीबखानाच्या उपदेशावरून अबदालीला खास जाऊन मिळणार अशी बातमी तेथे सदाशिवरावाला कळली. तेव्हां रामाजी अनंत व नारो शंकर ह्यांना पूर्वी सजाउद्दौल्याकडे भाऊने पाठविले होते त्यांना त्याने अर्ध्याच रस्त्यावरून परत बोलाविलें व यमुना