पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४२). परंतु प्रसिद्धपणे त्याचा पुकार त्यांनी कधीच केला नव्हता. येणेप्रमाणे दोघांर्चीहि मनें परस्परांविषयी संशयग्रस्त झाली होती. प्रसिद्धपणे एकमेकांचे नुकसान करण्याची दोघांचीहि इच्छा नव्हतो; परंतु, अंतस्थ रीतीने एकमेकांचे नुकसान करण्याचे प्रयत्न दोघांचेहि चालू होते. गोविंदपंत उत्पन्नाच्या बाबतीत नुकसान करून दाखवील हे पेशवे जाणून होते. ह्याच्याहि पलीकडे जाऊन राजकारणांत तो कांहीं घोंटाळा करील हे मात्र काही काळपर्यंत त्यांच्या स्वप्नीहि नव्हते. परंतु पेशव्यांचे हे अज्ञान फारच हानिकारक होते. कारण, सरकारचे उत्पन्न गोविंदपंतानें कमी तर कलेच; परंतु एवढेच करून तो थांबला नाही. तर पेशव्यांच्या मर्जीतला जो दत्ताजी शिंदे त्याचेंहि १७५९ व १७६० तील रोहिल्यांच्या व अबदालीच्या लढाईत नुकसान केलें; अशा भीतीनें की, पेशव्यांप्रमाणे दत्ताजीहि आपली कमावीस आपल्याकडून काढून टाकील. गोविंदपंताने केलेल्या दत्ताजीच्या नुकसानाचा व हानीचा पत्ता पेशव्यांना विलकुल नव्हता. कारण, रोहिल्यांशी व अवदलीशी दत्ताजीचें युद्ध चालले असतांना, लढाईची दत्ताजीसंबंधी वगैरे वातमी पेशव्यांना गोविंद पंतच देत असे. तींत रोहिल्यांना आपण दिलेली फूस, ऐन अबदालीशी लढाई होण्याच्याप्रसंगी आपण मागितलेला निरोप, प्रत्यक्ष लढाईपासून दूरदर राहण्याची आपली इच्छा, वगरे स्वकृत दुष्कर्माचे वर्णन गोविंदपंतानें केले नाही, हे उघडच आहे. ह्यावेळी पेशव्यांना पाठविलेल्या पत्रांत, अबदालीचे वर्चस्व, मराठी सैन्याची दुर्दशा, शिंद्यांची हानि वगैरे प्रसंगांची माहिती देऊन मदतीला ताबडतोब सैन्य पाठवून द्यावे, अशी गोविंदपंतानें. सविनय प्रार्थना केली. त्यावरून गोविंदपंताला शिंद्यांविषयी फार कळकळ वाटते अशी पेशव्यांची समजूत झाली. दत्ताजीला गोविंदपंताचा राग आला होता, गोविंदपंताने सुजाउदोल्याकडून व नजीबखानाकडून लांच खाल्ला होता, दत्ताजीला यश आले काय किंवा अबदालीला आले काय, गोविंदपंताला त्याची फिकीर नव्हती (लेखांक १४७), वगैरे प्रकरणे पेशव्यांना माहीत नव्हती. वृद्ध गोविंदपंत दत्ताजीला व जनकोजीला साहाय्य करून आपण हिंदुस्थानांत येईतोपर्यंत आपली बाजू संभाळीत आहे अशी पेशव्यांची समजूत होती. ह्याच समजुतीवर भिस्त ठेवून बाळाजी बाजीरावाने व रघुनाथरावाने उदगीरच्या मोहिमेंतून गोविंदपंताला स्नेहाची व आश्वासनाची पत्रे पाठविली. ह्याच समजुतीवर भिस्त ठेवून सदाशिवरावभाऊनेंहि पडदूर वगैरे ठिकागांहून वर लिहिलेल्या कामगिया करण्यास गोविंदपंताला लिहिले. त्या त्याने कशा बजाविल्या तें पढें दिसन येईल. १७६० च्या २८ एप्रिलाय सदाशिवराव सीहोरास आला (लेखांक १७४). तेथून त्याने माधोसिंग, बिजेसिंग, कोटेवाले राणाजी वगैरे रजपूत संस्थानिकांना येऊन मिळण्याविषयी पत्रे व वकील पाठविले. हे सर्व संस्थानिक दोन्ही डगरीवर हात ठेवून होते. जिकडे जोर दिसेल तिकडे त्यांचा जाण्याचा विचार होता. सदाशिवराव जवळ आल्याकारणाने मराठ्यांना येऊन मिळण्याचा त्यांनी रुकार दिला. परंतु आंतन अबदालीकडे त्यांचा आढा होता. सीहोरच्या आसपासच्या काही दंगेखार मवासांचे पारिपत्य करून मराठे खेचीवाड्यांत