पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७१ अरुण येथे १४ मेला आले. तेथील अहिरांचे बंड मोडून भाऊनें नरवराच्या दिशेने कुच केलें. ह्यावेळी अबदाली अंतर्वेदीत अनुपशहरी होता. त्याने जहानखान व नजीबखान ह्यांना मराठ्यांच्या ताब्यांतील अंतर्वेदीतील इटावे शहराकडे दबाव टाकण्याकरितां व सुजाउद्दौल्याशी स्नेह करण्याकरितां पाठविले. अंतर्वेदीत ह्यावेळी गोविंदपंताचा पाराशर दादाजी नामेंकरून कोणी पथक्या होता. त्यांच्या सैन्याचे व यवनांच्या सैन्याचे युद्ध झाले, त्याची सर्व फौज उठोन गेली (लेखांक १८१) व सकुरावाद, ठाणे यवनांच्या हाती पडलें (लेखांक २०९ ). ह्याच सुमाराला बक्षी व सुमेरसाचा पुत्र रतनसा ह्यांनी बंदेलखंडांत बंड केलें (लेखांक १८४ ). काशीतहि कोंकणस्थ व क-हाडे यांचे भांडण लागलें ( लेखांक १८५). गोविंदपंताच्या ताव्यांतील जे बुंदेलखंड, अंतर्वेद व कडाकुरा प्रांत त्यांच्यांत काही ठिकाणी ही अशी बं. अधून मधून होत होती. ही बडे मोडून जेणेकरून सरकारकिफायत होईल तें काम करणे ह्मणून शिंदे, होळकर व सदाशिवरावभाऊ ह्यांनी गोविंदपंताला हुकूम केला. सुजाउद्दौला, मलकाजमानी, अलीगोहर व मीरजाफरखान ह्यांच्याशी राजकरण करून ह्यांना मराठ्यांच्या बाजूला आणण्याचा प्रयत्न करा ह्मणून गोविंदपंताला मागे सदाशिवरावभाऊनें सांगितलेच होते.तेव्हां आंत व्यवस्था ठेवून बाहेर राजकारण करण्याचे दुहेरी काम गोविंदपंतावर येऊन पडले. ती दोन्ही कामें त्याने अर्धीमुधी केली. रतनसाला मायेंत घेऊन अंतर्वेदींतील अंमल गोविंदपंतानें आठ पंधरा दिवस कसा तरी राखला (लेखांक १८७ ). अलीगोहराला पातशाहा करावयाचा व त्याची वजिरी सुजाउद्दौल्याला द्यावयाची असें वचन दिल्यास सुजा मराठ्यांना मिळण्यास तयार आहे ह्मणून गोविंदपंतानें सदाशिवरावभाऊस लिहिले. तेव्हां शामजी रंगनाथ यास भाऊनें सुजाकडे वकिलीस पाठवून दिले (लेखांक १८९) व आपण मालन, पाहारीवरून ग्वालेरीकडे कुच केलें. सदाशिवराव ग्वालेरीस ३० मेला आला (लेखांक १९४). तो सरदारांच्या ह्मणजे शिंदेहोळकरांच्या सांगण्यावरूनच आला (लेखांक १८०,१८७ व टीप२७०). सरदारांनी हि लक्ष्मी नारायणाच्या हस्ते सुजाउद्दौल्याकडे बोलणे लाविलेच होते. ह्याच सुमाराला नजीबखान व जहानखान यांणी इटाव्यास वेढा घातला (लेखांक १९४) व अंतर्वेदीतील ठाणेदार दूरच्या अवाईनच आपली ठाणी सोडून पळून जाऊ लागले. तेव्हां गोविंदपंताने सदाशिवरावाला इटाव्याकडे कांहीं सैन्य पाठवून देण्यास विनंति केली. सदाशिवराव ने गोविंदपंताला असे लिहून कळविलें की केवळ दुरची अवाई ऐकून तुमचे ठाणेदार ठाणी टाकून पळतात ही शरमेची गोष्ट आहे; अशा पळपुट्या ठाणेदारांचे उत्तम प्रकारें पारिपत्य करून ते अत्रूने दम धरून हंसतील अशी व्यवस्था तह्मीं अवश्य करावी; ह्मणजे दुसऱ्या ठाणेदारांस वचक बसून ते झुंझून मरतील परंतु पळणार नाहीत (लेखांक १९५). अशी ताकीद करून २ जूनला भाऊ ग्वालेरीहून निघाला तो ४ जूनला ढवळपुराच्या खाली पांच चार कोंस चमेल नदीवर आला (लेखांक १९६ ); ८ जूनला चमेलीच्या उत्तर तीराला गेला व ११ जूनला वोडशियास जाऊन पोहोचला ( लेखांक २०२). आग्याला ताबडतोब जाऊन लागण्याचा भाऊचा