पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झणजे प्रांताचें जें कसोशीने रास्त उत्पन्न येईल त्याचा भरणा सरकारांत करावयाचा च नोकरी केल्याबद्दल अमूक एक वेतन घ्यावयाचे अशा त-हेची कमावीस करण्याची पाळी आली, तेव्हां गोविंदपंताला मख्त्याच्या वेळेस खरोखर उत्पन्न केवढे मोठे येत असे च तो सरकारांत मख्ता किती कमी देत असे हे पेशव्यांना कळून आलें ( लेखांक २४२). त्यावेळी १७५७ त गोविंदपंताबरोबर गोविंदपंताच्या प्रांतांतील उत्पन्नाची चवकशी करण्याकरितां व त्याचे मागील हिशेव तपासण्याकरितां पेशव्यांनी येरंडे व कानिटकर हे दरखदार पाठवून दिले. चवकशी करण्याच्या कामी गोविंदपंत व त्याचे मुत्सद्दी ह्यांनी दरखदारांना आणवतील तितके अडथळे आणिले. जमीदारांची व त्यांची भेट होऊ दिली नाहीं; कुळे व मामलतदार ह्यांच्यामध्ये कसर काय निघतें तें त्यांना दाखविलें नाहीं व जमाबंदीचे खर्डे व हिशेब त्यांच्या दृष्टीस पडू दिले नाहीत. यद्यपि गोविंदपंताने दरखदारांना धाब्यावर बसविण्याची इतकी मेहनत केली तत्रापि पुण्याच्या फडांत सदाशिवरावभाऊ व रामचंद्रबाबा शेणवई ह्यांच्या हाताखाली कामें केलेल्या ह्या कारकुनांना गोविंदपंताची सर्व बिगे कळून आली. प्रांतांची जमा कमी करून कशी दाखवितात; वाईट महाल सरकारांत कसे ठेवितात; अंतस्थ नजराणे कसे घेतात व फौजेचा खर्च वाढवून कसा दाखवितात वगैरे विंगें त्यांनी सरकारांत कळविली. ही विंगें पुण्यांत १७५७ तच सदाशिवरावभाऊला कळून चुकली होती.१७५७त गोविंदपंताची बंदेलखंडांत रवानगी करतांना त्याला सदाशिवराव भाऊनें उत्पन्नाचे नवीन अजमास व बेहेडे करून दिले (लेखांक २३७ शेवट), त्यांत गोविंदपंताच्या प्रांतांतून जास्ती जमा किती व्हावी ह्याचा ठोकळ अजमास होता. गोविंदपंताच्या प्रांतांत जाऊन ह्या अजमासाप्रमाणे जमेचा व खर्चाचा बारीक तपशील लावण्याकरितां सदाशिवरावभाऊनें येरंडे व कानिटकर यांना पाठविले.त्यांची व्यवस्था गोविंदपंतानें कशी केली तें वर सांगितलेच आहे. दरखदार येऊन कमाविशीनें मामलतीची सुरुवात झाल्यापासून गोविंदपंतानें निराळेच वर्तन आरंभिले. १७५७ त पुण्याहून निघतांना प्रांतांचा व्यवस्था उत्तम ठेवितों ह्मणून पेशव्यांना त्याने ज्या लांब लांब गोष्टी सांगितल्या होत्या त्या सर्व एकीकडे ठेवून तो प्रांतांचे कमी उत्पन्न करून दाखविण्याच्या खटपटीस लागला ( लेखांक २३९ ). रयतेला दिलदिलासा देण्याचे काम त्याने सोडून दिले; कुळांनी लावणीसंचणी करावी ह्याकरितां मख्त्याच्या वेळी तो त्यांना तगाई देत असे ती त्याने बंद केली व येरंडे व कानिटकर ह्यांना न भेटतां तो अंतर्वेदति निघून गेला. हाताने सरकारचे असें नुकसान करून तोंडाने मात्र सरकारचा नफा होईल तितका करून देईन असें येरंज्यांना लिहिण्यास त्याने कमी केले नाही. “ ज्याप्रमाणे श्रीमंत स्वामीची मर्जी त्याप्रमाणे मजला करणे आणि तुमची खषी तेंच नजला करणे, " असा त्याने येरंड्यांना व पेशव्यांना लिहिण्याचा पाठ ठेविला ( लेखांक १४२ ). परंतु ह्या त्याच्या गोड भाषणांना पेशवे भलले नाहीत. योग्य वेळ आली ह्मणजे गोविंदपंताची मामलत काढून टाकावयाची असा त्यांनी अंतस्थ वेत केला. ह्या अंतस्थ बेताची कुणकुण गोविंदपंताच्या कानावर गेली होती (लेखांक