पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करितां रघुनाथरावदादा, गोपाळराव पटवर्धन, विसाजी कृष्ण विनीवाले वगैरे सरदार ठेवून, नाना पुरंधरे, बळवंतराव मेहेंदळे, महीपतराव चिटणीस ह्या मंडळीसह भाऊ क विश्वासराव पन्नास हजार फौज घेऊन ४ एप्रिलास ब-हाणपुरास येऊन पोहोंचले; १० एप्रिलच्या सुमारास हांडियास आले व तेथून दरमजल मधील वाटेने झणजे शिहूर, भोपाळ, सीरोंज, अरूण, मालन, पहारी, कलेधार, नरवर, ग्वालेर, ढवळपूर या मार्गाने आग्याकडे जाण्याचा त्यांचा विचार होता. समशेर बहाद्दर, विठ्ठल शिवदेव विंचूरकर, मानाजी धायगडे दिल्लीच्या कामांतून काढून दत्ताजीने दक्षिणेत पाठविलेला अंताजी माणकेश्वर, माने, निंबाळकर वगैरे बारा तेरा हजार फौज, देशची वीस हजार फौज व गाडदी आठ हजार ह्याप्रमाणे पडदुराहून निघतेवेळी फौज भाऊसाहेबाबरोबर होती. दमाजी गायकवाङ, इभ्रामईखान गार्दी स्वतः, संताजी वाघ वगैरे मंडळी पुढे गेली होती ती रस्त्याने येऊन मिळाली. आपण दरमजल हिंदुस्थानांत येऊन पोहोचतों असें गोविंदपंत बदेल्याला पडदुराहून १५ मार्चाला लिहून सदाशिवरावभाऊनें त्याला दोन चार गोष्टी अवश्य करण्याचे सुचविलें ( लेखांक १६७ ). सुजाउद्दौल्याला आपल्या बाजूला वळवून घ्यावे, ही पहिली सूचना होती. १७५९ च्या डिसेंबरांत अबदाली शुक्रताली रोहिल्यास मिळाल्यावर सुजाउद्दौला रोहिल्यांना सोडून अयोध्येस गेला. कारण, सुजाउद्दौल्याचे व अबदालीचे पिढीजाद वाकडे होते. सुजाउद्दौल्याचा बाप जो सफदरजंग वजीर त्याने १७५० त मल्हारराव होळकर व जयाप्पा शिंदे ह्यांना अवदालीला तंबी देण्याकरितां बोलाविलें होतें. ह्याच सफदरजंगानें १७४८ त अबदालीचा सरहिंदास पराजय केला होता. १७५१ त अहमदखान बंगषाचा कादरगंजास पराभव करून फत्तेच्या मसनदीवर ज्याला शिंदे, हाळेकरांनी बसविलें तो सफदरजंग ह्मणजे सुजाउद्दौल्याचा बापच होय (का. पत्रे, यादी १६२ व लेखांक १७३ ). त्यावेळी सफदरजंगाने मराठ्यांचे हे उपकार स्मरून त्यांना. काशी व प्रयाग ही दोन क्षेत्रे देण्याचे वचन दिले होते. परंतु, १७५४ च्या जुलैंत बाबूराव महादेवाला श्रीक्षेत्र ताव्यांत घेण्याकरिता पेशव्यांनी पाठविले असता त्याला सफदरजंग अडथळा करूं लागला ( लेखांक २९ ) . तेव्हां त्याच्यावर नागोरचे काम झाल्यावर स्वारी करण्याचा जयाप्पाचा विचार होता (लेखांक ३७). पुढे सफदरजंग १७ अक्टोबर १७५४स वारला ( लेखांक ४१) व त्याचा मुलगा सुजाउद्दौला नवाब झाला. १७५५च्या पुढे सुजाउद्दौल्यावर स्वारी करावयाची तों मध्येच जयाप्पा नागोरास आटोपला. १७५७ त रघनाथरावाची हिंदुस्थानांत स्वारी झाली. त्यावेळी काशीत अंमल बसविण्याचा विचार होता; परंतु, १७५८ च्या मेपर्यंत रघुनाथराव लाहोरास गुंतल्यामुळे त्याच्या हातून तें काम झाले नाही. बारा लाख रुपये घेऊन सुजाउद्दौल्याला रघुनाथरावाने व विठ्ठल शिवदेवाने सोडून दिले. १७५९ त दत्ताजीला काशी, प्रयाग व बंगाला.हे प्रांत जिंकण्याची कामगिरी नानासाहेबाने सांगितली. त्याप्रमाणे दत्ताजी १७५९ च्या मेंत अंतर्वेदीत शिरला व नजीबखानाला तंबी देऊन सुजाउद्दौल्यावर जाणार तो सुजाउद्दौल्याने नजीबखानाशी स्नेह