पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राजी झाला; परंतु आतां तें बोलणे पेशवे कबूल करीतना ( लेखांक १४९ ); तेव्हां लढणे हाच मोगलाला शेवटचा उपाय राहिला व उदगीरची मोहीम सुरू झाली. ९ जानेवारीला भाऊसाहेब परळीजवळ गेले त्यावेळी त्यांजवळ पंचवीस हजार सैन्य व दहा हजार गाडदी होते व निजामअल्लीपाशी दहा हजार फौज व दहा हजार गाडदी होते. सलाबतजंगाची व त्याचा दिवाण निजामअली यांची ह्या वेळेस फारच हलाखी होती. बसालतजंग फुट्न कर्नाटकास गेला; मुसावूसी १७५८ च्या जूनांत पांडिशेरीस गेला व इभ्राईमखान पेशव्यांचा चाकर झाला (लेखांक १५४ ). उदगिरीजवळ १७६० च्या १९ व २० जानेवारीला मोगलांशी दोन युद्धे झाली, त्यांत मोंगल अगदी नरम आला (लेखांक १६०), परंतु त्याचे पक्के पारिपत्य १७६० च्या फेब्रुवारीला उत्तमोत्तम झालें (लेखांक १६५). ह्या लढाईचे सविस्तर वर्णन विस्तरभयास्तव मी येथे देत नाही. कारण, ते ह्या ग्रंथांतील लेखांक १५१ पासून १६७ पर्यंतच्या पत्रांत ज्यांनी साक्षात् ती लढाई मारिली त्यांनी स्वतःच केले आहे. लढाईनंतर जो तह झाला त्यांत निजामाचा बहुतेक प्रांत पेशव्यांनी घेतला (टीप २४१ पहा ). दक्षिण घेण्याचा येथपर्यंत पहिला भाग झाला. ह्यापुढे खरे पाहिले तर सदाशिवरावभाऊनें दुसऱ्या भागाला ह्मणजे श्रीरंगपट्टणावर स्वारी करण्याच्या उद्योगाला लागावयाचें; परंतु, तें काम त्याला तसेंच टाकून द्यावे लागले. कां की, उदगीरची मोहीम सुरू होऊन पंधरा दिवस होतात न होतात तों दत्ताजी शिंद्याच्या पराजयाची वर्तमाने आली. हिंदुस्थान गडबडले आहे, संस्थानिकांचा अबदालीकडे फितूर आहे, वगैरे बातम्या लागोपाठ येऊ लागल्या. तेव्हां उदगीरची मोहीम हाती घेतल्यासारखी यथास्थितपणे शेवटास लावून श्रीरंगपट्टणाकडे न जातां हिंदुस्थानांत सरदारांच्या साहाय्याला जाणे पेशव्यांस भाग पडले.१७५९च्या मार्चात दक्षिण सबंद मोकळी करण्याचा जो बूट पेशव्यांनी योजिला होता तो तसाच अर्धा टाकून हिंदुस्थानांतील सरदारांची पडती बाजू सावरण्याची पेशव्यांस तयारी करावी लागली. ह्या कामाकरितां सदाशिवरावभाऊ व बाळाजी बाजीराव रंगपंचमीला ह्मणजे ७ मार्च १७६०ला पडदूर येथे भेटले ( लेखांक १६८)व तेथें आठ रोजपर्यंत हिंदुस्थानांत कोणी जावें याबाबत खलबत झाले. हिंदुस्थानांत दादांनी जाऊ नये वगैरे पुष्कळ बाबींची शहानिशा १७५९ च्या दसऱ्यास पुण्यासच झाली वगैरे भ्रामक विधाने अनेकांनी केली आहेत. त्यांचा विचार २५४ व्या टिपेंत व २४५ ब, ह्या टिपेत सविस्तर केला आहे. त्या टीपांकडे वाचकांचे लक्ष्य पोहोंचवून, प्रस्तुत अर्थाकडे वळणें रास्त दिसते. पडदूर येथील खलबतांत सदाशिवरावभाऊनें हिंदुस्थानांत जावे असा सिद्धांत झाला. असा सिद्धांत होण्याचे मुख्य कारण रघुनाथरावाचा नाकर्तेपणा हे हाय. ह्या नाकर्तेपणाचे स्वरूप मागे दाखविलेंच आहे. सदाशिवरावभाऊनें ह्या नाकर्तेपणाची ओळख राघोबाला ह्या वेळी दिली. ती त्याला मर्माग्री झणाणून त्याने आपण होऊन हिदुस्थानांत जाण्याचें नाकारले ( ऐतिहासिकलेखसंग्रह नं. १४ ). बाळाजी बाजीरावाच्या व सदाशिवरावभाऊच्या मनांत रघुनाथरावाने