पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(टीप २१५). परंतु त्याच्या येण्याचा फारसा उपयोग झाला नाही. जी गत शिंद्यांची झाली तीच मल्हाररावाची झाली. मार्च महिन्याच्या४ किंवा ५व्या तारखेस मल्हाररावाचे सरदार शेट्याजी खराडे, त्याचा पुत्र शिवाजी खराडे, रामाजी यादवाचा पुत्र आनंदरावराम व गंगाधर यशवंत चंद्रचूड ह्यांची व अबदालीची गांठ पडली व चंद्रचूडाखेरीज बाकीची सर्व मंडळी ठार झाली. मल्हारराव होळकर स्वतःमागेच राहिला होता. ह्या मागे मागें रहाण्याच्या कामी गोविदपंत बंदल्याशी मल्हाररावाचें साम्य चांगलें जुळतें. ह्यावेळी मल्हाररावाचें वय ६४ वर्षांचे व गोविंदपंताचे सुमारे तितकेंच असावें. दोघेहि वयस्क झाले असून तरुणपणची तडफ त्यांच्या अंगी राहिली नव्हती. जेथे जातील तेथे माघार घेण्याचा त्यांचा विचार फार असे. लढाईच्या कामी त्यांचा उत्साह जरी थंडा होत चालला होता तरी द्वेष, मत्सर, कुढाभाव, स्वामिद्रोह व मित्रद्रोह करण्याच्या कामी ह्या दोघां मातान्यांचे पाऊल सारखें पुढे होते. द्वेष व मत्सर ह्या गोड व तिखट दुर्गुणांना भुलून जाऊन ह्या दोघांनी दत्ताजीचे व पेशव्यांचे अतोनात नुकसान केले. असो. शिंद्यांप्रमाणे मल्हाररावाची दुर्दशा झाल्यावर मेच्या सुमाराला शिंदेहोळकर केरौलीच्या आसपास राहिले व अबदाली यमुनेच्या उत्तरतीरी अंतर्वेदीत अनुपशहरी जाऊन बसला. ___शिंद्यांच्या पराजयाची बातमी १७५९ च्या डिसेंबरांत व १७६०च्या जानेवारीत पेशव्यांना पोहोंचली. त्यावेळी पेशवे उदगीरच्या मोहिमेंत गुंतले होते. शिंद्यांची अबदालीशी युद्धे १७५९ च्या जूनच्या अगोदर झाली व त्याच्या अगोदर त्यांनी पेशव्यांना मदतीस येण्याविषयी पत्रे पाठविली वगैरे भ्रामक विधाने रा. नातू ह्यांनी महादजीच्या चरित्रांत (पृष्ठे ५४५५) केली आहेत. त्यांचे निरसन २४५ व्या टीत मी साधार केले आहे. येथे फक्त १७५८ त दत्ताजी हिंदुस्थानांत गेल्यापासून सदाशिवरावभाऊनें व बाळाजी बाजीरावाने १७६० च्या मार्च-एप्रिलपर्यंत केलें काय त्याचे दिग्दर्शन करितों. . १७५७ त शिंदखेडच्या लढाईत विश्वासरावाला मदत न केल्याबद्दल जानोजी भोसल्यावर बाळाजी बाजीराव व सदाशिव चिमणाजी चालून गेले ते१७५८च्या एप्रिल-मेंत पुण्यास आले. १७५८च्या जून पासून सप्टेंबरपर्यंत ते पुण्यास होते.१७५८ च्या जुलैंत रघुनाथराव लाहोराहून पुण्यास आला. पुढे बाळाजी बाजीराव अक्टोवरांत कोंकणांत पुळ्याच्या गणपतीस गेला. तो १७५९च्या माचीत पुण्यास आला. तोंकालपर्यंत पुण्यांत सदाशिवरावभाऊ कारभार पहात होता.१७५९च्या मार्गात गोपाळराव गोविंद श्रीरंपट्टणाकडे मोहीम करीत होता; दत्ताजी शिंद्या दिल्लीहून लाहोराकडे चालला होता व कोंकणांत मानाजी आंग्रे व रघोजी आंग्रे कांसे, उंदेरी वगैरे शामळाची स्थलें घेण्यांत गुंतले होते ( का. पत्रे, यादी ६१,७६,१०२). बाकी हिदुस्थानांत व दक्षिणेत वरकांती शांतता विराजत होती. ह्यावेळी सदाशिवरावभाऊच्या व बाळाजी बाजीरावाच्या मनांत कांही प्रचंड कल्पना खेळत होत्या. सर्व हिदुस्थान व सर्व दक्षिण महाराष्ट्रसाम्राज्यांत अंतर्भूत करण्याचा त्यांचा मनोदय होता. हे अवाढव्य कृत्य पुढील वर्षी ह्मणजे १७६० त उरकावयाचा निश्चय करून त्यांनी दत्ताजीला लाहोरचा