पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राहिले होते त्यांपैकी कित्येक नजीबखान बाहेर निघाला अशी खोटीच दहशत खाऊन गंगेच्या अलीकडे येतांना पाण्यांत वुडून मेले, कित्येक वाहवले व कित्येक मारले गेले. ह्या प्रसंगाचे वर्णन करितांना गोविंदपंतानें दत्ताजीच्या व्यवस्थेची थट्टा केली आहे (लेखांक १४१). मराठ्यांची फौज १७५९ च्या ७ नोव्हेंबरला गंगेअर्ल कडे आली; तो थोडक्याच दिवसांत अशी बातमी आली की अबदाली लाहोरास येऊन पोहोचला. १७५८ च्या मेंत रघुनाथरावानें तैमूरशहाला हाकून दिल्यापासून अबदाली हिंदुस्थानांत येणार होताच. परंतु बलुचिस्थानांत नासीरजंगाने बंड केलें होतें तें मोडून शिकारपूरच्या वाटेने हिंदुस्थानांत येण्यास त्याला १७५९ चा नोव्हेंबर महिना लागला. अबदालो ज्याअर्थी १७५९ च्या नोव्हेंबरांत लाहोरास आला त्याअर्थी १७.९ च्या सप्टेंबरांत तो अनूप शहरी आला ह्मणून कीन ह्मणतो ( Fall of the Mogul Empire p, 41 ). तें अविश्वसनीय आहे हे उघड आहे. दत्ताजीच्या मनांत नजीबखानाला पक्को तंबी पोहोचवावयाची होती, परतु अबदालीच्या येण्यामुळे दत्ताजीला तें काम तसेंच ठेवून द्यावे लागले व तो लवकरच शुक्रनालास आला. रोहिले व सुजाउद्दवला यांना दवकाविण्याकरितां गोविंद बल्लाळाचा पुत्र बाळाजी गोविंद ह्यास ठेवून दत्ताजीनें यमुनेकडे मोर्चे वळविले (लेखांक १४३ ). शुक्रतालाहून कुच करून दत्ताजी यमुना कुंजपुयावर उतरला व अबदालीशी टक्कर देण्याची तयारी करू लागला. लाहोरास आल्यावर शीख लोकांची व अबदालीची एक मोठी लढाई झाली. सावाजी शिंदे व त्रिंबक बापूजी ही दोन पथके दत्ताजोनें १७५८ त पंजावांत ठेविली होती, ती दोन्ही महिना पंधरा दिवसांच्या अंतराने दत्ताजीला येऊन मिळाली. लाहोरास अबदाली आला त्याच वेळी सावाजी शिंदे दत्ताजीस शुक्रताल येथे येऊन मिळाला. त्रिंबक वापजी अबदालीच्या पुढे सरकत सरकत सरहिंदापर्यंत आला. तेथे त्याची व गव्हारांची लढाई जुंपली. त्या लढाईत त्रिंबक बापूजीचे पथक गव्हारांनी सर्वस्वी नागविलें. त्रिबक बापूजीच्या पथकांतील माणसें-उघडी बोडकी अशी-दत्ताजीच्या सैन्यास नोव्हेंबरच्या २३ व्या तारखेला मिळाली ( लेखांक १४६ ). कुंजपुऱ्याहून दत्ताजी निघाला तो त्याची च अबदालीची सविधता दहा कोसांच्या अंतराने ७ डिसेंबरी झाली ( लेखांक १५५). ह्या सुमारास येरंड्यांना भेटावयास जाण्याकरितां गोविंदपंत दत्ताजीपाशी निरोप मागू लागला. ह्याचा राग येऊन दत्ताजी अबदालीला रेटण्यास एकटाच निघाला व गोविंदपताला आपले कबिले बुणगे दिल्लीकडे घेऊन जाण्यास त्याने सांगितलें (लेखांक १४७). इतर काही मंडळीबरोबर गोविंदपंत बुंदेल्याला दत्ताजीने पुढें अबदालीच्या तोंडावर पाठविले ह्मणून भाऊसाहबाच्या बखरीच्या आधारावर रा० नात महादर्जाच्या चरित्रांत (पष्ठ ४९ लिहितात तो खरा प्रकार नसून, गोविंदपंत मागे राहिला. ह्या प्रसंगासंबंधाने लिहित असतां गोविंदपंतानं फारच चमत्कारिक शब्द वापरिले आहेत. अबदालीची व दत्ताजीची " आज लढाई अगर प्रात:का होईल” असें येरंड्यांना कळवन गोविंदपंत पढें ह्मणतो “ईश्वर ज्यास यश देईल त्यास सुखें देऊं!" ह्या वाक्यावरून व विशेषतः "सुखें " ह्या शब्दावरून गोविंदपंताची