पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३) अवदालीचें पारपत्य करावयाचें. (४) रोहिलखंडांतील रोहिल्यांची व्यवस्था लावावयाची.. (५) काशी, प्रयाग, बंगाला वगैरे प्रांतांवर पूर्वेकडे स्वारी करून मातब्बर पैका मेळवावयाचा. (१) सरकारी मुलुखांतील मामलतदारांची चौकशी करावयाची. (७) दामो दर महादेव, बापूजी महादव, लक्ष्मण शंकर, गोविंदपंत बुंदेले, नारो शंकर, अंताजी माणकेश्वर वगैरे मंडळी पैशाची अफरातफर करितात त्यांची तारी बहाली करावयाची. (८) नजीबखानाला नाहीसा करावयाचा व ( ९ ) जिंकिलेल्या प्रदेशांतून पैसा मिळवून पुढे मोहीम करावयाची. ह्या कामांपैकी काही कामें रघुनाथरावाने अर्धीमी केली व काही मुळीच करावयाची सोडिली. रजपुतान्यांतील माधोसिंग, बिजसिंग वगैरे संस्थानिकांच्या मामलती विल्हेस लावण्याच्या कामी मल्हाररावाने रघुनाथरावदादाला बरेच अडथळे आणिले (लेखांक ७१, ६६). कां की, ह्या मंडळीला मल्हाररावाची आंतून फूस होती. सहारणपूर, जालापूर वगैरे ठिकाणचे रोहिले रघुनाथरावाला शरण आले. परंतु, नजीबखान रोहिला दादासाहेबाच्या हाती लागला नाही. १७५७ त पातशाहाला व गाजुद्दिनाला फसवून नजीबखान अबदालीला मिळाला होता. रघुनाथराव दिल्लीस आल्यावर या लुच्चाचे शासन करणार तों तो दिल्लीतून मोठ्या शिताफीने पळून गेला. पुढे त्याने मल्हाररावाला. अंतस्थरोतीने पैसा देऊन रघनाथरावाचा राग कसा तरी टाळला ( लेखांक ४८). लाहोरास जाऊन जाहान-- खान व अबदालीचा पुत्र तैमूरशाहा यांना रघुनाथरावाने घालवून दिले व मराठ्यांचा अंमल त्या प्रांतांत बसविला; परंतु अबदालीचा कायमचा बंदोबस्त त्याच्या हातून झाला नाही ( का. पत्रे, यादी ३४१). आपण गेल्यावर पाठीमागून अबदाली लाहोरास येईल, ह्मणून अंताजी माणकेश्वराने दादासाहेबाला सुचविले होते. (का. पलें, यादी ३४१ ).. परंतु, पावसाळ्यामुळे दादाला देशी लवकर जाणे भाग पडलें व अबदालीचा कायमचा चंदोबस्त करण्याचे, मामलतदार व मुत्सद्दी यांची चवकशी करण्याचे व पूर्वेकडे स्वारी करण्याचे काम तहकूब ठेवून तो पुण्यास परत आला. ह्या स्वारीत मिळकत काडीचीहि न करितां रघुनाथराव एक कोट रूपये कर्ज करून आला. ह्या कर्जाचे ओझें बाळाजी बाजा-- रावाला फारसे वाटलें नाहीं (टीप २५४ पहा ). बाळाजी बाजीरावाला रघुनाथरावाचा जो राग आला तो वरील नऊ कामें त्याने केली नाहीत ह्मणून आला. माधोसिंग,, बिजेसिंग वगैरे संस्थानिकांचा कल अबदालीकडे आहे; दामोदर महादेव, - लक्ष्मण शंकर वगैरे मंडळी रयतेंत फितूर करितात; अंतस्थ नजराणा घेऊन मल्हारराव नजीबखानाला आश्रय देतो; काशी, प्रयाग देण्याच्या सुजाउद्दौला नुसत्या थापा मारितो; गोविंदपंत वगैरे मामलतदार पैशाची अफरातफर करतात; वगैरे कथा पेशव्यांच्या मुत्सद्दी मंडळांत प्रसिद्ध असून व त्यांचा प्रतिकार करण्याकरितां रघुनाथरावाला मुद्दाम पाठविले असून, त्याच्या हातून जेव्हां तें काम झाले नाही तेव्हां रघुनाथरावाच्या नाकर्तेपणाचा नानासाहेबाला व भाऊसाहेवाला वीट आला व पुढे कोणलाहि महत्त्वाच्या नाजक प्रसंगी रघुनाथरावावर कामगिरी सोपविण्यात अर्थ नाही अशी त्यांची खात्री झाली. रघुनाथरावाच्या ह्या