पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असतां अबदाली १७५१ च्या जानेवारीत पंजाबांत आला व त्याने मुलतान व लाहोर हे दोन प्रांत काबीज केले. १७५२ त हे प्रांत मराठ्यांनी अबदालीपासून हिसकावून घ्यावयाचे ; परंतु त्या साली शिंदेहोळकरांना गाजुद्दिनाला घेऊन दक्षिणेत यावे लागल्यामुळे तें काम त्यावेळी त्यांना करितां आलें नाहीं. १७५४ व १७५५ त मल्हारराव, जयाप्पा व रघुनाथराव कुंभेर, नागोर, दिल्ली, रोहिलखंड ह्या प्रदेशांत अंमल बसविण्यांत गुंतले होते, त्यामुळे त्यावर्षी लाहोराकडे त्यांना दृष्टि फेकितां आली नाही. पुढे १७५७ त अवदाली थेट दिल्लीपर्यंत चालून येऊन त्याने आग्रा, मथुरा वगैरे शहरें लुटली. त्याचा हेतु दक्षिणेतहि चालून येण्याचा होता ( लेखांक ६५ व ६३ ). परंतु, ती निवळ गप्प होती. बाळाजी बाजीराव रघुनाथरावाला अबदालीवर १७५७ च्या जानेवारीत पाठवून देऊन आपण स्वतः श्रीरंगपट्टणास गेला. “ अबदालीची गडबड दिवसेंदिवस अधिक ऐकत असतां आपला मुलुख खाली टाकून आपण श्रीरंगपट्टणास गेला" हे योग्य केलें नाहीं ह्मणून लेखांक ६५ त शहानवाजखान बाळाजी बाजीरावास दोष देतो. ह्यावरून एवढे मात्र स्पष्ट दिसते की बाळाजी बाजीराव अबदालीची फारशी तमा धरीत नव्हता. रघुनाथरावाचहि अबदालीविषयीं असेंच मत होते. लवकरच त्याचे पारपत्य करितों ह्मणून १७५७ त रघुनाथरावाने वारंवार उद्गार काढिले आहेत ( लेखांक ५४,६६,६७, ७१). परंतु रघुनाथराव दिल्लीस जाऊन पोहोचण्यापूर्वीच झणजे १७५७ च्या जुलैपूर्वी ह्मणजे १७५७ च्या एप्रिलांत अबदाली अफगाणिस्थानास परत गेल्यामुळे दादांची व अबदालीची गांठ पडली नाही. अबदाली १७५७ च्या सप्टंबरांत दिल्लीस होता ह्मणून कीन वगैरे मंडळी ह्मणतात तें निराधार आहे, हे १५३ व्या टिपेंत मी सप्रमाण दाखवून दिले आहे. १७५७ च्या जुलैंत रघुनाथरावदादा दिल्लीस गेले व रोहिलखंड, दिल्ली, रजपुताना वगैरे प्रदेशांची व्यवस्था लावून १७५८ त त्यांनी लाहोर प्रांत जिंकून घेतला. हा प्रांत जिंकण्याचा १७५० तच मराठ्यांचा विचार होता; परंतु अनेक अडथळे येऊन तें काम १७५८ त साधले गेले. हे काम १७५७ तच साधावयाचें; परंतु, मल्हारराव होळकराने अनेक लचांडे काढून तें १७५८ पर्यंत होऊ दिले नाही ( लेखांक ६७ ). ह्याच वेळी मल्हाररावाने नजीबखानाचें साधन करून ठेविलें (लेखांक ४८); त्यामुळे रघुनाथरावाच्या तडाक्यांतून नजीब वाचला. नाही तर मराठ्यांच्या कुशीतील ही ब्याध त्याच वेळी नाहींशी झाली असती. आपण दिल्लीस असेतोपर्यंत अबदाली परत न आल्यास, सुजाउद्दौल्याचे काशी, प्रयाग वगैरे प्रांत घेऊन मुबलक पैसा उगविण्याचाहि रघुनाथरावाचा विचार होता (लेखांक ७१). परंतु लाहोरावर स्वारी केल्यामुळे रघुनाथरावाच्या हातून हा विचार पार पडला नाही. काशी व कांहीं खंडणी देण्याची गोड अभिवचने देऊन सुजाउद्दौल्याने रघुनाथरावाला देशी लावून दिले ( का० पत्रे, यादी ३७३, ३८७ ). १७५७ व १७५८ तल्या स्वारीत बाळाजी बाजीरावाने रघुनाथरावाला खालील कामें नेमून दिली होती. (१) रजपुतान्यांतील संस्थानिकांची व्यवस्था लावावयाची. ( २ ) दिल्लीच्या पातशहाची व्यवस्था लावावयाची.