पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करतो असा संशय पेशव्यांना आल्यावरून येरंडे व कानिटकर हे दोन दरखदार १७५७ त पेशव्यांनी गोविंदपंताबरोबर दिले. त्यांनी गोविंदपंताविरुद्ध खालील नऊ तक्रारी आणिल्या (लेखांक १४१ ). (१) मागील जमा आहे त्यापैकी सोडून देऊन जमा करितात. (२) शिबंदीप्यादाचा खर्च जास्त वाढविला. पांच प्यादे होते तेथे पंचवीस ठेविले. (३) फौज मन मानेल तशी ठेवून खर्च बहुत करतात. (४) जेथें शिबंदी बहुत नलगे ते परगणे शिंद्यांकडे देतात व बहुत शिबंदी लागती ते ____परगणे सरकारांत ठेवितात. (५) भेटी व नजराणे अंतस्ते घेतात. (६) महालांचा दाखला दाखवीत नाहीत. (७) ह्यांच्या दहशतीमुळे रयत किंवा जमीदार कोणी आमांस भेटत नाही. (८) कलमरुजुवात होत नाही. (९) कारभारी मान मानेल ते मिळवितात. ह्या नऊ तक्रारी सदाशिवरावभाऊंनी पाहून त्या गोविंदपंताचा पुणे येथील वकील बाबराव नरसी यास दाखविल्या. बाबूरावाने तक्रारींचीहि याद जशीच्यातशीच गोदिंदपंताकडे पाठविली. ती पाहून गोविंदपंतांचे धाबें दणाणून गेले व तो येरडे व कानिटकर यांची आपल्यास संभाळून घ्या ह्मणून विनवणी करू लागला. ह्यासंबंधानें लेखांक १३३ पासून लेखांक १५० पर्यंत व सुद्धा पत्रे वाचण्यासारखी आहेत. त्यांत गोविदपंत पैशाची अफरातफर करीत असे ह्याची शाबिती गोविंदपंतानं आपली आपणच करून घेतली आहे. येरंडे हिशेष समज वून देण्याकरितां गोविंदपंताला आपल्याकडे बोलावीत असतां गोविंदपंत निरनिराळ्या सबबी काढून भेटायाला येण्याचे कसें लांबणीवर टाकीत होता हेहि ह्या पत्रांवरून व पत्रांखाली दिलेल्या टिपांवरून कळून येईल. येरंडे दोन साले बुंदेलखंडांत राहिले; परंत. गोविंदपंताचे मंडळीने त्यांना एक जमीदार अगर पाटील भेटू दिला नाहीं (लेखांक १४२). मागील तीन सालांचा हिशोब त्यांस न दाखवितां हिशोबाचे रुमालहि गोविंदपंत आपल्या बरोबर घेऊन गेला ( लेखांक १५० ) आणि संशय येऊन येरंडे जेव्हां गोविंदपंताचा जामदारखाना जफ्त करूं लागले तेव्हां त्यांच्यावर रागवावयालाहि गोविंदपंतानें कमी केलें नाहीं ( लेखांक १३४). गोविंदपंताच्या प्रांतांत आपली कांहींच दाद लागत नाही असे पाहून येरंडे पुण्यास जाऊ लागले तेव्हां गोविंदपंत कांहींसा नरम आला व नम्रतेच्या गोष्टी बोलं लागला. " दरवारी नानाप्रकारें नालिशी, चुगली करितात " त्याने आपले नकसान होते असे त्याने येरंड्यांना कळविले व त्याच पत्री रयतेकडे आपण कसर ठेवीत होतो हे कबूल केलें ( लेखांक १३८ ). मोहिमेहून परत आलों ह्मणजे तीन सालांचा हिशोब व रयतेकडील बाकी दाखवून देण्यास आपण तयार आहों ह्मणून त्याने येरड्यांना लिहिले; कारण, “ दरवारचा रंग पाहिला, खावंद चौकशी करूं लागला, तेव्हां पैसेयाचा