पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खंडाचा अंमल येऊन त्याचा अधिकार बराच वाढला व तो काही झगण्यासारखी फौजहि ठेवं लागला. गोविदपताच्या कैफियतीच्या प्रारंभी व सागरच्या कैफियतीच्या शेवटी दिलेले संवत् खरे आहेत हे वरील संदर्भावरून ध्यानांत येईल. संवत् १७९६ ह्मणजे १७३९१४० पर्यंत बुंदेले हिस्सा बिनतक्रार देत गेले. तोपर्यंत लक्ष्मण शंकराकडे बुंदेलखंडाची कमावीस होती. पुढें बुंदेले हिस्सा देण्यास तक्रार करूं लागले तेव्हां संवत् १७९८ त झणजे १७४१. १७४२ त गोविंदपंताच्या हवाली बुंदेलखडाची कमावीस पेशव्यांनी केली. पुढे जैतपूरची लढाई झाल्यावर संवत् १८०२ त ह्मणजे १७४६ त बुंदेलखंडाची बुंदेल्यांनी कायमची वाटणी करून दिली व संवत् १८०३ त ह्मणजे १७४७ त गोविंदपंताची बुंदेलखंडांतील मातबर मामलतीची कारकीर्द सुरू झाली. ह्यावेळेपासून ह्मणजे १७४७ पासून गोविंदपंताच्या भरभराटीस प्रारंभ झाला. १७३३ त गोविंदपंत बुंदेलखंडांत आले हे अनेक ग्रंथांवरून सिद्ध आहे, ह्मणून रा. पारसनीस ह्मणतात तो त्यांचा केवळ गैरसमज आहे. बाजीराव १७४० त वारल्यावर बुंदेले हिस्सा देण्यास तक्रार करू लागले. त्यावेळी गोविंदपंताची नेमणूक बंदेलसंडाच्या कमाविसीवर झाली. ह्यासंबंधाने बाजीरावाच्या मृत्यूचा सन १७३९ ह्मणन भारतवर्षकार देतात तोहि चुकला आहे. काव्यतिहाससंग्रहांतील पत्रं यादीतील ११ वें पत्र १७४० च्या २९ सप्टेंबराला चिमाजीआप्पाने लिहिले आहे. ह्याच संग्रहांतील ४९ व्या पत्रांत १७४१ च्या जानेवारीत बाजीरावाला मरून आठ महिने न झाले तोंच चिमाजीआप्पा वारले ह्मणन बाळाजी बाजीराव धावडशीच्या स्वामीस लिहितो ह्यावरून वाजीराव १७४० च्या मेंत वारला हे स्पष्ट आहे. असो. इ. स. १७४७ च्या पुढे गोंविंदपंत फौजफाटा ठेवून बुंदेलखंडांत अंमल बसवू लागला. १७५४ त गोविंद बल्लाळ बराच वजनदार मामलतदार झाला होता (लेखांक ३६). ह्या वेळी अंतर्वेद व बंदेलखंड ह्या प्रांतांतील पेशव्यांच्या व सरदारांच्या वांटणीचा मुलूख त्याच्याकडे कमाविशीन होता (लेखांक : १). लेखांक: १ (१४ मार्च १७५७) त जनकोजी शिंद्याने बाळाजी गोविंदाला कमावीसदार ह्मणून हुकूम केला आहे. लेखांक ६० त रघुनाथरावदादा गोविंद बल्लाळाला मातब्बर मामलतदार ह्मणन ह्मणतो व त्याचा मुलगा जो बाळाजी गोविंद त्याला मगरूर ह्मणून नांवें ठेवितो. लेखांक ५४ त रघुनाथरावदादा गोविंद बल्लाळाची गणना लहान थोर वगैरेत करितो. १७५७ त “ आपल्या मुलुखांतील चौकशीचा मजकूर पेशव्यांच्या मनांत होता” असें लेखांक ५४ वरून दिसते. ह्यावरून १७५७ त आपल्या मलखांतील मामलतदार जे गोविंदपंत वगैरे मंडळी त्यांच्याविषयी पेशव्यांना संशय येऊ लागला होता, हे उघड आहे. १७५७ त खेतसिंगाकडील वकील रघुनाथरावदादाकडे गेले असतां वाळाजी गोविंदाला मोठी भीति पडली व गोविंदपंताला ही बातमी ताबडतोब कळवा झणजे ते पुण्यास “जी खबरदारी करणे ती करतील" अशी त्याने आपल्या कारकनांना सख्त ताकीद केली. कां की, खेतसिंगाचे वकील रघुनाथरावाला स्वतंत्रपणे जाऊन भेटले असतां आपली कारस्थाने बाहेर पडतील अशी बाळाजी गोविंदाला भीती पडली होती. गोविंदपंत आपल्या मामलतीत पैशाची अफरातफर