पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ह्यांत संशय नाही. ह्या द्वैतभावाला सातारचे छत्रपती मुळीच कारण झाले नाहीत. पेशव्यांची सत्ता वाढून आपली सत्ता संपुष्टांत येत आहे व शिंदे ह्या संपुष्टीकरणाला मदत करीत आहेत ह्या भीतीपासून मल्हाररावाच्या मनांत हा द्वैतभाव उत्पन्न झाला. अंताजी माणकेश्वर हा लफंगा गृहस्थ १७५५ त हिंदुस्थानांत जाऊन ( का पत्रे, यादी ४५१ वगैरे) दत्ताजी शिंद्यास नागोरास मिळाला. १७५६, १७५७ व १७५८ ही तीन सालें तो दिल्लीस होता ( लेखांक ५२,५७,६३ व का. पत्रे, यादी वगैरे ३३७, ३४१). तेथील वादशाही कारस्थानांत त्याचा वराच हात असे. बहुत मर्दपणा व काबीलपणा करून दाखवून, पेशव्यांकडून सरदारी मिळवावी ही त्याची मुख्य आकांक्षा होती. परंतु, अत्रूची दरकार टाकून पाशची अफरातफर करण्याची सवय या गृहस्थाला असल्यामळे - पेशव्यांची ह्याच्यावर गैरमजी असे. ह्याने १७५७ त अबदालीला चांगला हात दाखविला. परंतु अबदालीची फौज भारी त्यामुळे ह्याचा फारसा उपाय चालला नाही. पेशव्यापाशी अंताजीची पत मुळीच नव्हती. बापूजी महादेव व दामोदर महादेव हे पेशव्यांच्या तर्फे दिल्ली प्रांतांत मामलतदार होते. ह्यांच्यावरहि पैशाच्या बाबतीत पेशव्यांची गैरमर्जी होती (लेखांक ६९ ). नारो शंकराचा भाऊ लक्ष्मण शंकर ह्याचीहि पत पेशव्यांजवळ फारशी नव्हती (लेखांक५९). गोविंद वल्लाळ खेर ह्याला वाजीरावाने १७३३ त बुंदेलखंडाचा सुभेदार केलें ह्मणून कोठे कोठे लिहिलेले आढळते ती निव्वळ गप्प आहे. गोविंद बल्लाळ १७३९-४० त लहानसा कमावीसदार ह्मणून बुंदेलखंडांत कदाचित् आला असावा. त्यावेळी बुंदेलखंडांतील मुख्य अधिकार नारो शंकराचा भाऊ लक्ष्मण शंकर याजकडे होता. काव्येतिहाससंग्रहांतल्या पत्रे, यादीतील नंवर ११ च्या पत्रांत बुंदेलखंडासंबंधानें गोविंद बल्लाळाचा मुळीच उल्लेख केला नसून लक्ष्मण शंकराचें नांव प्रमुखपणे उल्लेखिले आहे. हे पत्र १७४० च्या २९ सप्टेबराला लिहिले आहे. गोविंदपंत १७४६ व १७४७ तहि फरसा महत्त्वास नकार नसन सामान्य कमाविसदारच होता, हे पत्रे, यादीतील ६२,६९,७४,९५,९९ ह्या पत्रांवरून उघड होते. ही पत्रे १७४६।१७४७ त लिहिलेली आहेत ( ह्या पत्रांच्या तारखा प्रस्तावनेच्या शेवटी दिल्या आहेत ). बुंदेलखंडांतील जैतपूर, कालिंजर, अजेगड वगैरे स्थले ज्याअर्थी शिंदे, होळकर १७४६।१७४७ त घेत होते त्याअर्थी गोविंद बल्लाळाचें महात्म्य बंदेलखंडांत त्यावेळी फारसे वाढले नव्हते हे स्पष्ट आहे. गोविंद बल्लाळ त्यावेळी साधा कमाविसदार नसून जर लढवय्या शिपाई असता तर बुंदेलखंडांतील लढायासंबंधाने त्याचे नांव वर उल्लेख केलेल्या पत्रांतून अवश्य येते. १७४६।१७४७ पर्यंत सबंद बुंदेलखंड मराठ्यांच्या हातांत आले नव्हते. ह्या साली जैतपुरची लढाई होऊन कालिंजर वगैरे ठिकाणे मराठ्यांच्या ताब्यांत आली व पुढे लवकरच सरदारांच्या व पेशव्यांच्या वांटण्या झाल्या आणि पेशव्यांच्या वांटणीची व सरदारांच्या वांटणीची कमावीस गोविंदपंताला मिळाली. तेव्हांपासून गोविंदपंताच्या हाती सर्व बुंदेल