पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांचा विचार करण्याची येथें जरूरच राहत नाही. शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड, विंचूरकर राजेबहादर, बुंधेले, वैगेर सरदारांच्या मामलतदारांच्या वर्तनांचा तेवढा येथें विचार करावयाचा आहे. वर नमूद केलेल्या ९ बंधनांनी ह्या सरदारांच्या व मामलतदारांच्या हालचाली नियमित करून टाकिलेल्या होत्या. कोणतेंहि मुलकी किंवा लष्करी लहान मोठे काम करावयाचे असल्यास सरदारांना व मामलतदारांना पेशव्यांची परवानगी घ्यावी लागे. राज्याची सर्व सूत्रे पेशव्यांच्या हातांत एकीभूत झाली होती. मोहिमा, तह, महालांची जमा व त्यांचा खर्च ह्या सर्वांची व्यवस्थपुण्याहून होत असे. सरदारांना स्वतंत्र हालचाल कोठेच करितां येण्याची सवड सदाशिवरावभाऊनें व बाळाजी बाजीरावाने ठेविली नव्हती. त्याकाली सत्तेचे केंद्रीभवन पेशव्यांच्या ठायीं पूर्णपणे होत चालले होते. हा केंद्रीकरणाचा उद्योग बाळाजी बाजीरावाने १७४० पासून सुरू केला. १७४४ त त्याने रघोजी भोसल्याची हालचाल मर्यादित केली. १७४६ त बाबूजी नाईक बारामतीकराला त्याने घरी बसविले. १७५० त प्रतिनिधि व यमाजी शिवदेव ह्यांची, १७५१ त दाभाडे व दमाजी गायकवाड ह्यांची व १७५३ त ताराबाईची रग जिरवून त्याने सातारच्या छत्रपतींचे महत्त्व कमी केले. सारांश, १७५३ च्या पुढे मराठ्यांच्या हालचालींची सर्व सूत्रे बाळाजीच्या हाती केंद्रीभूत झाली. पेशव्यांच्या हाती झालेल्या सत्तेच्या ह्या केंद्रीभवनाच्या विरुद्ध बरीच खटपट ह्यापुढें कांहीं सरदारांनी, मामलतदारांनी व मुत्सद्यांनी केली. ही खटपट सत्तेचे केंद्रीभवन झाले नव्हतें ह्मणून करितां आली अशी गोष्ट नसून, सत्तेचे केंद्रीभवन फार झाले व तें तत्कालीन कांहीं सरदारांना असह्य झालें ह्मणून ती करितां आली. होळकर, शिंदे वगैरे सरदारांचे पारडे पुढे फार जड होईल ह्मणून ह्या वेळेपासून बाळाजीने व सदाशिवरावभाऊनें त्यांना योग्य बंधनांनी जखडून टाकण्याचा बेत केला. हा बेत तडीस नेत असतां पेशव्यांना त्यांच्या स्वतःच्या सरदारांकडून अड. थळे येऊ लागले. पूर्वीच्या राजमंडळांतील सरदारांच्या शत्रुत्वाच्या ऐवजी आतां पेश व्यांच्याच सरदारांकडून पेशव्यांना त्रास पोहोचूं लागला. १७५० किंवा १७५३ सालापर्यंत बाळाजीने, दाभाडे, गायकवाड, प्रतिनिधि, यमाजी शिवदेव, ताराबाई व भोसले ह्यांचे महत्त्व कमी करण्याचा उद्योग केला. १७५० पासून पुढे पेशव्यांना आपल्याच सरदारांचे डावपेंच, कृत्रिमपणा, फितवेखोरी, व उद्दामपणा ह्यांना आळा घालण्याचे काम पत्करावे लागले. बाळाजी बाजीरावाच्या व सदाशिवरावभाऊच्या अधिकाराखाली सरदारांना स्वातंत्र्य फारच थोडे राहिले होते. तेव्हां केंद्रप्रवण न होतां स्वतंत्र होण्याचा उद्योग निरनिराळ्या हेतूंनी प्रोत्साहित होऊन निरनिराळ्या सरदारांनी केला. बाळाजी बाजीराव असेतोपर्यंत ( कदाचित् खडाची लढाई होईतोपर्यंत देखील ) हा उद्योग सफल झाला नाही. परंतु ह्या दुरुद्योगाचे हानिकर परिणाम पेशव्यांना पानिपत येथे व इतरत्र सोसावे लागले हे सोदाहरण सिद्ध करितां येण्यासारखे आहे. ह्या दुरुद्योगाच्या खटपटीसंबंधानें, , मल्हारराव होळकर, अंताजी माणकेश्वर, लक्ष्मण शंकर, बापूजी महादेव व दामोदर महा