पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देव, गोविंद बल्लाळ, गोपाळराव पटवर्धन, नारो शंकर, मानाजी आंग्रे, सदाशिव रामचंद्र शेणवई, रामचंद्र गणेश कानडे, त्रिंबकराव विश्वनाथ पेठे, मेहेंदळे, पुरधरे, चिटणीस, पाय गडे, थोरात वगैरे होत. हे सर्व सरदार पेशव्यांचे नोकर असत. उत्पन्नाच्या संबंधाने ह्या सरदारांची गणना मामलतदार ह्यगून होत असे. त्यांनी आपापल्या प्रांतांतील वसल उत्पन्न करून, खासा, कारकून व शिबंदी यांचा खर्च वारून बाकी राहील तो पैसा रसद माणन पुण्यास पोचवावा असा करार असे. ह्यांपैकी कित्येक मामलतदारांना लहान मोठ्या फौजा बाळगाव्या लागत. ह्या फौजांच्या खर्चाकरितां जे निव्वळ मामलतदार असत त्यांना महालांतून रोकड रकम मिळे व जे सरदार असत खांना सरंजामाला महालांतील कांहीं प्रांत स्वतंत्र तोडून दिलेला असे. ह्याप्रमाणे मुलकी व लष्करी अशा दोन नात्यांनी पेशव्यांशी सरदारांचा संबंध येई. सरदारांनी मोगलाईतील एखादा प्रांत काबीज केला ह्मणजे त्याची सरकार व सरदार ह्या दोघांत काही प्रमाणानें वांटणी होत असे. (१) सरदारांना आपापल्या प्रांताचा हिशोब वर्षाच्या वर्षास खडान् खडा द्यावा लागे. (२) सरदारांच्या ताव्यांतील प्रांतांतील संस्थानिक, जमीदार व रयत ह्यांना सरदार-मामलतदाराविरुद्ध तक्रार करावयाची असल्यास संस्थानिकांना खुद्द पुण्याच्या दरबारांत जाऊन दाद मागतां येत असे आणि जमीदार व रयत ह्यांना पेशव्यांनी पाठवून दिलेल्या दरखदारांना भेटन आपली गान्हाणी सांगतां येत. ( 3 ) सरदार-मामलतदाराकडून येणाऱ्या वार्षिक रसदेची रक्कम दरवर्षी नवीन ठरविली जात असे. रयतेकडून जास्त उत्पन्न मामलतदार घेतात असें दरखदाराच्या नजरेस आल्यास रसदेची रक्कम वाढविली जात असे. ( ४ ) सरकारी मोहिमांस पेशवे सांगतील तेव्हां सरदारांना आपापल्या सरंजामी फौजा घेऊन जावे लागे. (५) सरदारांच्या जहागिरीची तगारी बहाली पेशव्यांच्या खुषीवर असे. (६) तथापि ह्या जहागिरी वंशपरंपरेने चालणाऱ्या असत. (७) जहागीरदार निपुत्रिक झाल्यास दत्तक कायम करण्याचा अधिकार पेशव्यांचा असे. (८) एखाद्या सरदाराची वावगी वर्तणूक दिसल्यास त्यास बर्तर्फ करण्याचा अधिकार पेशव्यांस असे. (९) परराष्ट्रांशी किंवा संस्थानिकांशी तहरह पेशव्यांच्या नांवानें, संमतीने व आज्ञेप्रमाणे सरदारांना करावा लागे. १७५० पासून १७६१ पर्यंत ( सध्या ह्या अकरा वर्षांचाच विचार ह्या प्रस्तावनेत चालला आहे हे ध्यानांत धरून ) पेशव्यांचा सरदारांशी हा असा संबंध होता हे ह्या अकरा वर्षांतील घडामोडीसंबंधी जे काही कागदपत्र उपलब्ध झाले आहेत, त्यांवरून दिसून येते. ह्या कागदपत्रांत सातारच्या छत्रपतींच्यासंबंधी एक अक्षरहि नाहीं पेशवे आपले मुख्य आहेत व आपलें बरें वाईट काय पाहिजे तें करण्याचा अधिकार सर्वस्वी पेशव्यांच्या हातांत आहे असा सरदारमंडळांत सर्वत्र ग्रह झाला होता. सातारच्या राजमंडळांतील, प्रतिनिधी, सचिव, दाभाडे, सुमंत, राजाज्ञा वगैरे सरदार क्षुल्लक असून पेशव्यांच्या शिंदे, होळकर, विंचूरकर इत्यादि सरदारांप्रमाणे व पुरंधरे, फडणीस, मुजुमदार इत्यादि मुत्सद्यांप्रमाणे वजनदार पुरुष त्या राजमंडळांत एकहि नव्हता. तेव्हां