पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/530

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आले नाही. आले झणजे पाठवीन. वरकड वर्तमान तपशिलवार पेशजी लिहिले आहे, त्यावरून सेवेसि श्रुत जालें असेल. हल्ली तपशिलवार लिहावें तरी स्वामीस पत्र पावेल न पावेल. यास्तव न लिहिले. या उभयतांमध्ये हर्षामर्षच चालिला आहे. वरकड गोष्टींविशी तरी स्वामीची आज्ञा येईल त्याप्रमाणे करीन. दिवसेंदिवस माणस नजरेत नाहीसे दिसते. राजश्री खंडो शामराज येथे आले. त्यांस एकांती आह्मीं बहुत प्रकार पुशिले. हातचे अक्षर मात्र लिहीत नाही. तें अभिमानास्तव मात्र की कोणास कशास पत्र लिहावें, ऐसें भाषण करितात; दुसरा अर्थ किमपि नाही. देशीहि पत्रे श्रीमंत सौभाग्यवतीबाईस गेली आहेत. व येथे श्रीमंत करारेयांत ज्यांचे स्थली आहेत, त्याणी विनंति करून चुलतेयास आपलें पत्र पाठविले आहे. येकांती करून कोणास प्रगट नाही. गुप्तरूपेंकरून पाठविले आहे. तेथें विदित जालें असेल. व एक पत्र श्रीमंत मोरो बल्लाळ जोशी आहेत त्यांस गेले आहे. गुप्तरूपें तेहि येणार, ऐसी बातमी आहे. पहावें. स्वामीस विदित असेल. राजश्री जनकोजी शिंदे देशी गेले. भेटी श्रीमंताची जाली. उपरांत मनमानें ऐसें वर्तमान लोकांनी येथे उठविले आहे. लिहिले कोणाचें आलें नाहीं. त्यास सविस्तर सर्व लिहावयासी आज्ञा केली पाहिजे. आपले वर्तमान पेशजी लिहिले आहे त्याप्रमाणे आज्ञापत्र पाठवावे. त्याप्रमाणे मी करीन. विस्तारें काय लिहूं ? करारेयाचे मजकुरांत गुंता किमपि नाही. सेकसि विदित होय. एकोणिसाचे सालचे हिशेब अद्याप कोणाचे घेतले नाहीत. आणविले आहेत. पहावें. बहुत काय लिहिणे. हे विज्ञापना. [३०२ ] ॥श्री.॥ नोव्हेंबर १७६३. पुरवणी सेवेसि शिरसाष्टांग नमस्कार विनंति. करारेयाजकडील श्रामतांचे वर्तनान तहकीक तपशिलवार मुजरद काशीदाबरोबर लिहून पाठ