पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/529

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राजा येऊन भेटला. मामलत केली. कासी नरसी यास पत्र आले, तें श्रीमंत राजश्री बाळाजीपंत बाबाकडे पाठविले आहे. दोन त्याची नकल मी पाठविली आहे. पावेल. मोर्तबांत लेखनसीमा अक्षरे आहेत. विदित होय. प्रस्तुत कासी नरसी सागरांत आहेत. ते बाहेर जात आहेत. तयारी होत आहे. तिकडे जातो ह्मणून ह्मणत आहेत. पहावं. खाशाचे दस्तुरचे पत्र येत नाही, यामुळे गुंता किंचित दिसतो. परंतु राजश्री विश्वासराव लक्षुमण मातबर माणूस. ते इतकें करणार नाहीत. येथून कोणी मातबर शहाणा माणूस कारकून पाठवून मग करणें तें करावें, ह्मणून मी पांच चार वेळां मटले. परंतु त्यांचे विचारास येत नाही. देशी पत्रं श्रीमंतास गेली आहेत. संशय धरावा असें किमपि दिसत नाही. अक्षर मात्र येत नाही. वरकड लिहिणेयाची पद्धत वगैरे खुणांमध्ये अंतर किमपि नाही. संशय किमपि नाही. विदित होय. राजश्री विश्वासरावजींचाहि आकस यांजवर आहे. गणेश संभाजीस तों पिटून बाहेर घातला आहे. राजश्री बापूजी नारायण यांची तों मामलतच नरसीगडची जबरदस्तीने घेतली आहे. राजश्री चिंतो केशव यांजपाशी होतें तें बेइजत करून अडीच हजार रुपये सान्याचे हवाला करून घेतले; ह्मणून तो याकडून निघोन गणेश संभाजीकडे सडा गेला आहे. गणेश संभाजीने आपली दिवाणगिरी दिली. तहि करारयास जाणार. यांसी सीसी विरुद्ध. स्वार प्यादा सर्वांसी कज्या. सलुक आपल्यामध्यं व बाहेर कोठे नाही. राजश्री जनकोजी शिंदे ह्मणून पेशजी गेले त्यांचे वर्तमान तहकीक कळत नाही. तें लिहावयासी आज्ञा केली पाहिजे. झालं वर्तमान कच्चे पक्के लिहिले आहे. सेवेसी विदित होय. हे विज्ञापना.


॥ श्री. ॥ नोव्हेंबर १७६३. पुरवणी सेवेसि शिरसाष्टांग नमस्कार. विनंति विज्ञापना. काशीहून उत्तर ६ जनकोजी शिंद्याचाहि एक तोतया निघाला होता..