पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/531

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विणे ह्मणोन आज्ञा. न्यास, येथे राजश्री खंडो शामराज आले तें तो साँ स्तर लिहिलेच होतें. अलीकडील मजकूर तरी राजश्री विश्वासराव गोविंद शामराज व चिमणाजी वामन यांनी करारेयांत एके दिवशी रुब मिति केली की, आज दीड दोन महिने होत आले, फौजा येऊन कोण मामील होत नाही, आपले हातचे पत्र कोणास जात नाही, यास्तव त माहेबी मेहेरबान होऊन पुण्याच्या जोड्या आल्या आहेत त्यांस पत्र एक आपले हातची चिटी द्यावी; व सागरी कासी नरसी आहेत व गणेश संभाज आहेत ऐशा तीन चिट्या द्याव्या. शेवटी एक चिटी मनास येईल त्या द्यावी. आज्ञा झाली की आजपासून चौ दिवशी सर्व सांगाल त्याप्रमा करून देऊ. चिंता न करणे. चवथा दिवस आला ते समयीं प्रातःकाळ न तयारी करून कोणास न पुसतां शिकारीस गेले, ते नरवरच्या रोखे डीमागें विश्वासराय गेले. तो हे नरवरी दाखल झाले. निमे वाटेहून चिम णाजी वामन नरवरी गेले. विश्वासराय मध्ये मुकाम करून राहिले. संध्या काळी चिमणाजी वामन व खासे एके जागा राहिले. प्रातःकाळी जाबसात करणे तों किल्यावर राजाचे भेटीस गेले. सांगोन पाठविलें की तुह्मी करारे यास जाणे. आमाकडे न येणे. हे माघारे सर्व गेले. गोविंद शामराज डमल रीस गेले. राजाने हत्ती एक, पांच घोडे नजर केले. सरंजाम दिला. चार दिवस मेजवानी केली. उपरांत पांच सातशें स्वार बंदुकदार हजारापर्यंत राजाने आपला भाऊ देऊन सिरोंजचे रोखें आले. प्रस्तुत शहाडौरेयार आहेत. तेथून एक गृहस्त राजश्री बाजी रघुनाथ चितपावन झणन छोटेखान गहस्त होते, त्यास येथे याजकडे पत्र की घेऊन येणे. पत्रे यास आणिल ती कारकुनाने लिहिली. मोर्तब मात्र होतें. करारेयाहून पत्रं येत ती पद्धत वार. यांत कांहींच ठिकाणा नाही. नकल पाठविली आहे. पावेल. खास दस्तर तो नाही. गृहस्थ शपथ वाहतो. अन्यथा नाही. परंतु कागदापत्रावरून कळत नाही. भाषण हिंदुस्थानी. दक्षणी भाषण नाही. कागदपत्रीं ठिकाणा नाही. याणी कागद पाहिले. गृहस्थास शब्द लाविला, हे काय घेऊन आला ?