पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करणे उपयोगाचे आहे. बाळाजी बाजीरावाने सातारच्या छत्रपतींना शून्यवत् करून टाकिलें ही गोष्ट सर्वस्वी खरी आहे. परंतु, सातारच्या छत्रपतींना शून्य होऊन बसण्याखरीज अन्य गति शक्य नव्हती हीहि गोष्ट तितकीच खरी आहे. शाहूराजा वयातीत होऊन राज्य करण्यास अयोग्य झाला. त्याच्या मृत्यूनंतर रामराजा गादीवर आला. तो बद्धान मद, राजपदाला अयोग्य व मतलवाला अजागरूक असा होता. अशाचा बड़ीजाव करीत वसण्यांत व अशाच्या हाती राज्यसूत्रे ठेविण्यांत राष्ट्राचं हित कांहींच साधणे शक्य नव्हते. तेव्हां आत्यंतिक राष्ट्रहित साधण्याची ज्याच्या अंगी कर्तबगारी विशेष त्याच्या हातांत सूत्रं जाणे स्वाभाविक व अपरिहार्य होते. येणेप्रमाणे बाळाजीच्या हातांत राज्याची सर्व सूत्रे गेली व सातारचे छत्रपति, त्यांचं राजमंडळ व त्या सर्वांना मुठीत ठेवू पाहणारी ताराबाई ही साता-यांत भिकार तंटे करीत बसली. खर्चाकरितां साठ सत्तर लाखांचा मुलूख त्यांच्या नांवानें तोडून दिला होता ; परत, त्यांतील उत्पन्न, व्यवस्थन काढून घण्याचीहि ऐपत त्यांच्यांत नव्हती. १७५५त तर आपला खर्च पेशव्यांनी चालवावा व उत्पन्नाची व्यवस्था वाटेल तशी बघन घ्यावी (चिटणिशी बखर) अशी तोड त्यांनी काढिली. ह्यामुळे छत्रपतीचे, राजमंडळाचें व विशेषतः ताराबाईचे जे काही थोडेसे स्थानिक महत्त्व होते तेंहि गेले. ह्यापुढें ताराबाईला व रामराजाला वाळाजीच्या ओंजळीने पाणी पण भाग पडल. हे कर्म ताराबाईने आपल्या हाताने आपल्या अंगावर ओढवन घेतले व घरात बसून थिटे, देवस्थळे इत्यादि पुराणिकांच्या उपदेशाने बाळाजांच्या नांवाने मात्र खडे फोडण्यास तिनें प्रारंभ केला. ताराबाईच्या ह्या तोंडच्या बडबडीने १७५३ च्या पुढे बाळाजाचं कांहींच नुकसान झाले नाही. सरदारांपैकी-ब्राह्मण अगर मराठे--कोणीहि तिच्याकडे लक्ष्य दिले नाही. अर्थात् ताराबाईचा पुरस्कार करून बाळाजर्जाचें वाकडे करण्यास १७५३ च्यापुढे कोणीच धजला नाही. पानिपतच्या मोहिमेच्या वेळी तर ताराबाईचे व रामराजाचें स्मरणहि कोणास राहिले नाही. १७५१ त ताराबाईचा कड घेऊन भांडणारा दमाजी गायकवाड १७६० त पेशव्यांच्या बाजूने पानिपतच्या मोहिमेंत हजर होता. येणेप्रमाणे पानिपतीयुद्धांत ताराबाईच्यास- पेशव्यांचे काहीएक नकसान झाले नाही. मराठा सरदारांपैकी भोसल्यांखेरीज बहुतेक सर्व सरदार व ब्राह्मणांपैकीहि प्रतिनिर्धाखेरीजकरून बहुतेक सर्व सरदार पानिपतांत हजर होते. रामराजाला व ताराबाईला पेशव्यांनी शून्यवत् करून सोडिलें ह्मणून कोणी सरदार पेशव्यांच्या विरुद्ध गेल्याचा दाखला तर कोठे मिळत नाहींच; परंतु, कोठे ध्वनि देखील काहिलेला आढळत नाही. आतां मराठयांपैकी कांहीं सरदार व ब्राम्हणांपैकी काही सरदार पानिपतच्या मोहिमेंत पेशव्यांच्या उलट गेल्याचे दाखले सांपडतात. परंतु, त्या उलट जाण्याचा संबंध छत्रपतींच्या शून्यावस्थेशी मुळीच नसून, इतर कारणांशी आहे. ह्या कारणांचें स्पष्टीकरण पुढल्या कलमांत केले आहे. ( ब ) पेशव्यांच्या हाती सर्व सत्ता आली त्यावेळी मुख्य सरदार व मामलतदार झटले झणजे, शिंदे, होळकर, पगार, गायकवाड, भोसले, अंताजी माणकेश्वर, विठ्ठल शिव