पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/528

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बातमी मोंगलानें पाहोन मनसबा केला आहे. तुह्मास कळावें ह्मणोन लिहिले आहे. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति. [३००] ॥ श्री॥ नोव्हेंबर १७६३. सेवेसि शिरसाष्टांग नमस्कार विनंति. येथील क्षेम असो. विशेष. श्रीमंत राजश्री भाऊसाहन कर रेयास अश्विन व॥१३ स प्रगट नरवरी होऊन राजश्री विश्वासराव लक्ष्मण याणी घेऊन आले. तेथून पत्रे सर्व गृहस्तास आली. राजश्री कासी नरसी यांस आली. व विसाजी गोविंद यांस व बापूजी नारायण नरसीगडवाले यांस आली. खासे यांचीच पत्रं नांवची आली. खासे अक्षर लिहित नाहीत, ह्मणून राजश्री काशी नरसी मात्र न मानीत. वरकड चोहोकडे बंदोबस्त होत चालला. सर्वांस घरोघरी परस्परें तेथून पत्रे आपली आपली येतात, की श्रीमंत करार; गुंता किमापे नाही. सर्व जनांमध्ये दुसरा अर्थ दिसोन येत नाही. तेथून कासीद जोडी दोन आल्या, ते कागद वाचून कासीदास मुखमार्जन शिवीगाळी होतात. कचेरीत थट्टा की स्वर्गद्वार मोकळे झाले. ज्या बायकांचे पुरुष वारले असतील, त्याणी डोई वाढवावी ! नानाप्रकारें वल्गना होतात. श्रीमंत स्वामीची आज्ञा आली की चार लक्ष रुपये व हत्ती घोडे वगैरे सरंजाम दो लक्षांचा घेऊन हुजूर सत्वर येणे. त्याचे उत्तरहि पाठवीत नाहींत. सर्व लटके ह्मणतात. बापूंनी नारायण विसाजीपंत यांसहि पत्रं आलीं की हुजूर येणे. राजश्री बापूजी नारायण कार्तिक शु॥ १३ स निघान करारेयास जाणार. राजश्री गणेश संभाजी सिरोंजेस होते ते करारेयास गेले. पावतील. दतियावाले व वोडशावाले यांचे पांच येऊन पोचले. काही खजिनाहि आला. करायचे झासीचे मध्ये दिनारा मातबर जागा दुर्घट आहे. तेथील १ नारो शंकराचे पुतणे. २ गोविंदपंत बंदल्यांचे धाकटे बंधू. ३ विसाजी गोविंद चांदोरकर. ४ बुंदेलखंडांतील एक सरदार. ५ गणेश संभाजी खांडेकर हे एक बुंदेल्यांच्या बरोबरचे सरदार.