पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/527

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाहिजे. विशेष. कृपा करून पत्र पाठविले. पावलें. बहुत समाधान झाले. याच प्रकारे सर्वदा पत्र पाठवून संतोषवीत जावं. इकडील वर्तमान सविस्तर राजश्री कृष्णाजीपंती लिहिले आहे. सविस्तर तपशीलवार त्याजवरून कळेल. श्रीमंत राजश्री भाऊसाहेबांकडील वर्तमान लिहावे हाणोन लिहिले. त्यास आपण परस्परे तिकड ऐकतच आहां, त्याचप्रमाणे आहे. अधीकोत्तर लिहावं तर प्रमाणांत दिसत नाही. राजश्री गणेश संभाजी प्रस्तुत त्याजकडे गेले आहेत. थोडीबहुत नरवरवाल्याची फौज समागमें आहे. या प्रकारचे वर्तमान आहे. आह्मांस बुदले याणी बोलाविलें मदतीस, ह्मणोन येथे आलो आहो. एक दो रोजी भेटी होणार. पुढे विचार जो होईल तो लिहून पाठवू. आपणाकडील वरचेवर कुशलोत्तर कृपा करून लिहीत असावें. सुजातदोले यांनी करोलीचे घाटी पूल बांधोन बेणी बहादर कासम आली खां यांस पंचवीस तीस हजार फौजेनसी बुंदेले यांजवर पे॥ गहोंरा व कालिंजर पावतों जप्ती केली. राजे पर्णेयांत आहेत. कबीले सर्व डांगेंत तेजगड प्रांते पे।।- राहतां कालिंजर, आजेगड, मडका, जैतपूर ठाणी मात्र राहिली. बंदेलखंड त्याणे घेतले. तमाम रजवाडे वोडसे, दतीया, भदावर इजतखानसुद्धा त्यास मिळाले. सर्वांच्या चित्तीं सिरोंजपावेतों घंऊन यावें. मोंगलाचा जोरा भारी जाहला आहे. याजउपरि हे जागा राहतां मुशकील आहे. असो. ऋणानुबंध असेल त्याप्रमाणे घडोन येईल. आह्मीं श्रीमंत स्वामीस व उभयतां चिरंजिवांस इकडील सायंत वर्तमान वरचेवर लिहीत गेला. त्यांचे मर्जीस फौज पाठवून बंदोबस्त इकडील कांहीं करावा तें येत नाही. यास आमचा काय उपाय ? जशी मर्जी असेल तसे करून. आपण प्रसंगी आहेत. कळेल त्याप्रमाणे विनति करावी. आजपावतों जिवाभ्य श्रम करून खावंदाचा नक्षा राखिला आहे. पुढे सर्व मर्जी त्यांची. सिरोंजेस आले ह्मणजे उज्जेनपावेतों जागा गेली. फौजा माळवियांत नाहीत हे पर्ते यवनाने पाहून काम करीत आहे. आणि फौजाहि देशीहून येत नाहीत. कर्णाटक प्रांतीं जात आहेत. हे सर्व खबर १ ही १७६३ सालची पत्रे भाऊंच्या तोतयासंबंधाची काही हकीकत देतात.