पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/526

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गडबडेचा प्रसंग आहे. याबद्दल ईश्वर इच्छा असेल तें प्रमाण. मागाहून सविस्तर लिहून पाठवू. तुमची दोन तीन पत्रे पावली. मजकूर कळला. सदैव पत्रीं कुशलोत्तर संतोषवीत जावें. बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे. हे विनंति... राजश्री दादोपंत, धोंडोपंत, नारोपंत, सखोपंत, वेंकाजीपंत यांस नमस्कार लि॥ परिसजे. लोभ असो दीजे. हे विनति. [ २९८] ॥श्री॥ १ नोव्हेंबर १७६१. नकल. अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्यराजश्री नारो आपाजी गोसावी यांसिः सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ इसने सितैन यया व अलफ. जागा जागा किल्यांस फितूर होतात. त्यास, तुह्माकडे पुरंधर, वज्रगड आहेत तेथील तुह्मी खबरदारी उत्तम प्रकारे करणे. चौकीपाहारे अलग, नौबत दुरुस्त करवणे. पाहारे फेरवणे. किल्यावर बरें बरें माणूस ठेवणे. किल्ले सर्व सामानांनी पुरे संजुदे करणे. तुह्मी खबरदार सावध आहांच. तथापि चौकशीस आळस न करणे. किल्यांचीहि रणघरे नीट करून ठेवणे. फितुरी मनुष्य असेल त्याची अगोधर चौकशी करणे. जाणिजे. छ ३ ॥ खर. बहुत काय लिहिणे. - - - - [ २९९] श्रीशंकर. २४ जानेवारी १७६३. राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री जनार्दनपंत बाबा स्वामीचे सेवेसि. पोष्य काशी नरसिंह कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता॥ माघ शु॥ १० मु॥ आमानगज नजीक पणे जाणून स्वकीय लिहीत गेले