पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/523

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सालापासून सनद करून दिल्ही. त्याजकडे कारकुनी दरसाल पांचशें रुपये द्यावे असा करार केला आहे. सन १८१८ चे सालापासून द्यावे असा करार करून चिटी लिहून घेतली आहे. सतराचे त्याने सोडवन घेतले. आह्मास ह्मणाले तें माफ करावें. पुढे आपली कारकुनी घ्यावी. मग आह्मीं शेंपन्नास कमजास्ती करून ठीक करून घेतले. स्वस्त जाहले तरी येतील. कळावें. राजे रतनसा याजकडील वर्तमान पद्माकरपंतांनी लिहिला आहे त्यावरून सविस्तर कळेल. त्याजकडील शंभर रुपये मात्र दोनशेपैकीं आह्मी येथे घेतले आहेत. सीताराम बक्षीची जागड छ '६ जिलकादी दूर केली. आणि त्यापैकी चारशें स्वार व पांचशें प्यादे ठेविले, तेहि छ ६ जिल्हेजी दूर केले. त्याची तलब तीन हजार रुपये न दिले. आमची कारकुनी अलीकडील एका महिन्याची न आली. पलीकडील अगदी घेतली. परंतु त्यानी चिट्या करून दिल्या आहेत. बारा तेराशे वसूल होणे आहेत. येतील तेव्हां खरे. कळावें. शिंद्यांच्या परगणियांचे हिशेब सरकारांत पाठवणे ह्मणून श्रीमंत राजश्री दादासाहेब ह्यांचें ताकीदपत्र आले आहे. त्यास ते परभारा त्यांनी सरकारांत भरावे किंवा आह्मीं घेऊन सरकारांत द्यावे याचे सरकारांत ठीक करून लिहून पाठवावें. येथील गृहस्थाचें मानस आहे की परभारें सरकारांत द्यावे. आह्माकडे दाखला न द्यावा. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना. [२९६] ॥श्री ॥ ५ आगष्ट १७६१: पुरवणी सेवेसी शिरसाष्टांग नमस्कार विनंति. श्रीमंत भाऊसाहेब सि रीस आले. तेथे गणेश संभाजी जाऊन भेटले. तेथें गडी सिरसईची होती, ती घेतली. बंदोबस्त करून उभयतां नरवरास माघारे जाऊन तेथून दतियास गेले. दोन तीन हजार फौज बरोबर आहे. सिरोजेकडे यावयाचा मजकूर