पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/522

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ २९५] ॥ श्री॥ ५ आगष्ट १७६१. पे॥ आश्विन शुद्ध ४ शके १६८३. सेवेसि जोती गोपाळ व लक्ष्मण अंबाजी व कृष्णाजी भिकाजी व अंताजी कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना येथील वर्तमान तागाईत श्रावण शुद्ध १५ पर्यंत मु॥ रायपूर स्वामीचे कृपावलोकनेंकरून यथास्थित असे. विशेष. जेष्ठ शु॥ ५ चे गांडापुराहून पत्र आलें तें आषाढ शु॥ ४ स पावले. त्या आलीकडे आपणाकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाही. तेणेकरून चित्त सापेक्षित आहे. तरी तपशीलवार वर्तमान लिहावयासि आज्ञा केली पाहिजे. विशेष. उमरगड गेल्यानंतर उभयतां रायपुरी आहेत. इटावे येथीलहि ठाणे उठोन आलें. रोहिल्यांचे ठाणे बसलें. राजश्री गंगाधरपंत तात्या कोळेवर आहेत तसेच आहेत. जाटहि कोळेवर आहे. नजीबखान पाणीपतावर आहे. त्यास माधनसिंग व नजीबखान एकत्र जाहले आहेत. जाटाशी बिगाड केला आहे. गंगापारच्या रोहिल्यांचे सूत्र जाटाकडे लागले आहे. नजीबखान येकलाच वेगळा पडला आहे. जाटाचे मतें सुज्यातदोले यानीं वजीरी करावी, व गाजीदीखानाने बक्षीगिरी करावी. हे पातशाह अलीगोहर याच्या मनास येत नाही. गाजिदीखान अगदीच नसावा. आपल्या हाती द्यावा. त्यास जाट देत नाही. यामुळे जाटाचे व त्याचे बिघडेल, असे दिसते. गणेश संभाजी याणी राजश्री बाबूराव कोनेर याजकडील मामलत आपल्याकडे त्याचे तर्फेनें करून घेऊन झांशीस गेला, तेथे आहे. झांशीचा किल्ला हवाली करून घेतला. किसोरसिंग उमरगडी होता. त्याने कामकाज चांगले उमरगडी केले. त्यास उमरगड सुटल्यावर तो येथे आला. त्याने रदबदली केली की आपल्याकडे गांव आवरिया वगैरे आहेत, त्यांजपेकी दहा हजार रुपये सालाबाद घेतां ते माफ करावे. त्यावरून त्यास माफ करून सनद दिल्ही. सन सतराचे येणें होतें तेंहि माफ करून सतराचे ३३१ हे व पुढील दोन पत्रे पानिपतानंतरच्या गडबडीची आहेत. .