पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/521

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२९३] ॥ श्री ॥ ९ जुलै १७६१. से॥ दादो तानदेव कृतानेक सा॥ नमस्कार विज्ञापना येथील वर्तमान त। आषाढ शुद्ध ८ पावेतों यथास्थित असे. विशेष. श्रीमंत राजश्री उभयतां नानांनी पत्रे आपल्यास लिहिली आहेत त्याजवरून कळों येईल. मोगलाकडील वर्तमान तरी बेदरानजीक आहे. पंचवीस हजार फौज आहे. सरकारांत साठी लक्षांची जागीर घेतली तिची जमती मांडिली आहे. तमाम कारकून उठविले. आपले बसविले. आपण मुलेमाणसेंसुद्धा तेथे आहो. त्यांस औरंगाबाद जवळ. याजकरितां तजविजीने माणसें घेऊन आपण इकडे यावे. येविशी श्रीमंत राजश्री नानांनी आपल्यास लिहिले आहे. आधीं तजवीज करावी. बहुतशी गडबड नाहीं तों तजवीज करावी. श्रीमंत राजश्री दादा व राजश्री माधवराव काल बुधवारी वानवडीस गेले. आज तेथें मुकाम आहे. राजश्री चिटकोपंत नाना जेजूरीस गेले ते काल प्रातःकाळी आले. उदईक थेऊरचा मु।। आहे. नानाहि जातील. थोरले नाना स्वारीबराबर जात नाहीं. ऐसे दिसते. वरकड नवलविशेष वर्तमान लिहिजेसें नाही. मोगलाने बळ बांधिले आहे. श्रीमंत सातारा जाऊन सत्वरीच येणार. विदित जाले पाहिजे. सेवेसी श्रुत जाले पाहिजे. मुत्सदी अगदी जातात. कळावें. सेवेसी विनंति. [२९४ ] ॥ श्री ॥ विति. येथील प्रकार सांप्रत नवे घाट सर्वहि होतात. परंत निश्चय हा काळपावेतों कामाकारभाराचा नाही, सातारेहून फिरोन येऊन मग येथील काम चालतील. दिवस पुढील फार अवघड दिसत्या कात दिसतात. कळावे. हे विनंति.