पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/520

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाही. यास्तव दोन दिवस राहिले. एकादो दिवसांनी मुहुर्त आहे. जातील. श्रीमंत राजश्री नानाचे मनांत होते की पंढरपुरास जाऊन दोन महिने राहावें. ल्यास राजश्री सखारामपंताकडे गेले होते. निरोपाचा विचार पुशिला. निरोप देईनात, यास्तव राहाणें जालें. दरबारी कारभारी सखारामपंत व राजश्री बाबूराव फडणीस हे उभयतां आहेत. उभयतांचे चित्त एक जालें आहे. राजश्री सखारामपंत करार ह्मणतात. राजश्री दादा द्यावें ह्मणतात. देणे अद्यापि बंदच आहे. या द्या वरीच चालतें. कमाविसदारांस रसदेचें • मागणे लाविले आहे. राजश्री नारो शंकर यांचा पहिला करार जाला होता तो आपल्यास कळलाच होता. अलीकडे त्यास ह्मणतात की, आमास कर्जवाम फार जाले आहे. सबब रसद मागतात. ते कांहीं कबूल होत नाहीत. शेवट कसा होईल तें पहावें. राजश्री शिंद्याकडील मामलत आहे ती तुकोजी शिंदे याचा भाऊ महादजी शिंदे आउंधकर याचे नांवें सरदारी करावी, राजश्री रामचंद्र गणेश दादासाहेबापाशी होते त्यांस दिवाणगिरी सांगावी, ऐसें घाटत आहे. शागीर्दपेशा व इमारती व कामाठी व हशम यांचा बंदोबस्त होत आहे. कार्याकारण ठेवितात. वरकड दूर कांहीं केले, काही करणार. इमारती तुर्त चालत नाहींत. सर्वाध्यक्ष उभयतां आहेत. दादांचे व गोपिकाबाईचें व दोघे कारभारी यांचे एक चित्त एकत्र जाले आहे. पुढे कसकसे चालेल पहावें. राजश्री आबा व नाना पुरंधरे येथेच आहेत. तेहि सातारियास जाणार. सातारा गेलियानंतर पुढे कसकसा मजकूर होईल तो पहावा. सेवेसी श्रुत जाले पाहिजे. मागे जे मुत्सदी होते त्यांची चाल कांहीं विशेष दिसत नाही. शिलेदारांस व खर्चास ऐवज पाहिजे यास्तव कर्जपट्टी करावी ऐसी वार्ता आहे. विदित जालें पाहिजे. श्रीमंत सातारा जाणार. तिकडे कितेक दिवस लागतील तें पहावें. श्रीमंतांचें मानस आहे की लोकरीच यावे, मग पहावें. सेवेसी विनंति. पीरखान प्यादा याजब॥ नवी सकलाद चार गज व जुनी टोपी नानांची पाठविली आहे. पावेल. यादीचे कामास माणसें प॥ आहेत. कळावें. सेवेसी विनंति.