पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/519

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राजकी वर्तमान लिहिले आहे. ते पहावयासि पाठविलें तें पहावें. जबानी प्यादियाबरोबर निरोप आला की निजामअल्लीपासून वकिलाचा सांडणी स्वार आला. जप्ती करावयाबद्दल तेथून रवानग्या जाहल्या. त्या प्रांती जाहल्या. इकडहि लवकरीच येणार. याजकरितां सावध असावें ह्मणोन निरोप आला, त्याजवरून आपणास लिहिले आहे. मी उद्या संध्याकाळ पावेतों येतों अजमास हिशेब कांहीं समजाविला. कांहीं आज समजावितों, आणि उद्यां यतों. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [ २९२] ॥ श्री ॥ ६ जुलै १७६१. अपत्ये चिटकोबानें चरणावरी मस्तक ठेवून सा॥ नमस्कार विज्ञापना येथील वर्तमान त॥ आषाढ शुद्ध ५ पावेतों मुकाम पुणे येथे यथास्थित असे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. दरबारचे वगैरे सविस्तर वर्तमान तीर्थरूपांस तजविजीने पुसोन सत्वरच यावे किंवा आठाचौ दिवसांनी आले तरी कार्यास येईल ऐसा खुलासा काढून आह्मांस लेहन पाठवणे. त्यास, तीर्थरूपांनी पेशजी पत्र आपल्यास पाठविलेंच आहे. तीर्थरूपा मानस आहे की तुह्मीं सत्वरीच यावं. दरबारचा कारभार एक प्रकारचा जाला आहे. यास्तव त्यांचे मानस आहे की लौकर यावें. राजश्रीना गोविंद यांस मुजरत पत्र पाठविली आहेत की तुह्मीं सत्वर ये राजश्री दादासाहब व माधवराव सातारियास जाणार यावर साहित्याबद्दल जेजूरीस गेलो. टोपी व चार गज सकलाद हिरवी गहिरी रंगाची पाठवणे. त्याजवरून सकलाद गज चार एकण किंमत आठरा रु।। व टोपी एक पाठविली आहे. प्रविष्ट होईल. बहुत काय लिहिणे. कृपालोभ . असो दीजे. हे विनंति. श्रीमंत राजश्री चिटकोपंतनाना साहित्याबद्दल जेजूरीस गेले. मजला जाब लेहून देणे ह्मणून सांगितले. त्याजवरून पत्र लिहिले आहे. श्रीमंत. उभयतां सातारियास जाणार. त्यास, ताराबाईस बरें फार वाटत