पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३) मराठ्यांच्या राज्यव्यवस्थेत सत्तेचे केंद्रीभवन झालेले नव्हते, त्यामुळे निरनिराळ्या सरदारांना आपापली सत्ता स्वतंत्रपणे स्थापण्याची दुरिच्छा झाली. (४) जातिभेदामुळे मराठ्यांची एकी होण्याचा कधीच संभव नव्हता व कांहीं अघटित कारणांनी काही वेळ एकी झालीच तर ती लयास जाऊन व जातीजातींत मत्सर उत्पन्न होऊन सर्वत्र वेबंदशाही माजण्याचा संभव होता. तोच प्रकार १७६१ च्या अगोदर थोडाबहुत होऊन पानिपत येथे मराठ्यांचा मोड झाला. (५) भरतखंडांत सर्व हिंदूलोकांत राष्ट्रीयत्वाची कल्पना पसरली नव्हती. (६) ब्राह्मणांच्या पोटजातींत भेद झाला होता. (७) सदाशिवरावभाऊंचे वर्तन उद्दाम व सान्निपातिक होतें. (८) त्याने इभ्राईमखानाच्या तोफखान्यावर भिस्त ठेवून मोगलाई रीतीचा अंगीकार केला. (९) मराठ्यांची जुनी गनीमी रीत त्याने सोडून दिली. ( १० ) मराठ्यांच्या अंगी पूर्वीचा काटकपणा राहिला नव्हता. त्यांच्यामध्ये चैनबाजीचा प्रवेश झाला होता. (११) सडे जाऊन युद्ध करण्याचे सोडून सदाशिवरावभाऊनें कविलेबुणगे बरोबर घेतले. (१२) त्याने दिल्लीचे तख्त फोडून तद्देशीयांचे वैर संपादिले. (१३) सुजाउद्दौल्याने अबदालीशी तह करून देतों ह्मणून थाप देऊन मराठयांचा विश्वासघात केला. (१४) गिलज्यांच्या धिप्पाड व अर्बुज शरीरांपुढे मराठ्यांच्या ठेंगण्या व हलक्या मूर्तीचा टिकाव लागला नाही. (१५) सदाशिवरावभाऊनें रघुनाथरावदादासारख्या अनुभवलेल्या शिपायाला ह्या मोहिमेचे सेनापतित्व दिले नाही. सदाशिवरावभाऊला लढाईचा सराव नव्हता. (१६) मल्हारराव होळकर माळव्याच्या अलीकडे खाशांनी येऊ नये ह्मणून सांगत असतां भाऊने त्याचा उपदेश ऐकिला नाही. (१७) लाहोरास जाऊन अबदालीची धाड मुद्दाम बोलावून आणण्यांत रघुनाथरावाचा मूर्खपणा झाला. (१८) अबदालीसारख्या अनुभवलेल्या शिपायापुढे सदाशिवरावभाऊसारख्या नवशिक्या सरदाराचें कांहीं एक चाललें नाहीं. इत्यादि कारणे पानिपतास मराठ्यांचा मोड होण्यास झाली ह्मणून ग्रंथोग्रंथीं लिहिलेले आढळते. ह्या कारणांत तथ्य कितपत आहे व मराठ्यांचा मोड होण्याची खरी कारणे कोणती ह्याचा विचार करणे जरूर आहे. (अ) स्वामिद्रोहोत्पन्नपापाचे दैवी परिणाम काय झाले असावे त्याचा तलास लावण्याचे काम धर्मशास्त्रयांकडे सोपवून, त्या पापाचे मानवी परिणाम काय झाले ह्याचा विचार