पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/518

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांप्रत कारभारी कोण ? त्यास, र॥ सखारामपंत, बाबूराव फडणीस. वरकडहि आहेत. परंतु दोघे तुर्त कामकाजाचा बंदोबस्त करितात. श्रीमंत उभयतां मंगळवारी निघोन सातारेस जातात. मंगळवारी जेजूरीस मु॥, बुधवारी दहीगांव, गुरुवारी माहुली, येणेप्रमाणे मु॥चा ठराव जाहाला आहे. तेथूनहि लवकरच येणार. तीन दिवस तेथे राहावें, मागती यावें सारखा तुर्त येथे निश्चय आहे. तीर्थरूपांनी पंढरीस जावयाचा छंद धरला आहे. आपण लवकर यावें. चार वरसें जाहाली. वडील अवघडात घालून गेले. ज्या दिवशी भेट होईल ते समयीं सर्व काळजी हारवेल. तुर्त येथे स्वारीचा व दानधर्माचा समय, याजमुळे माणसांस एकदोन दिवस अधिक लागल. हिशेबाच्या एकदोन कलमांचा तफावत लिहिला; तर आपण एकादो दिवशी येतील. सर्व येथे नीट होईल. तीर्थरूप नाना खासगत यादी समजावयाचे व किरकोळ सरकारी हिशेब समजावणे, सरकारकून कारखाने तमाम मना होता, त्याहि यादीबिदी अवधा वेळ नेऊन, सरकारांत दाखवन, करारमदार करून नवे घ्यावे. तेणे॥ खर्चवेच करावा. पागा अवस्या मोडून पांचपांच प्यादे करावे. कामाठी देखील दूर करितात. दोनचारों कामाठी कार्याकारण ठेवावे. असे नानाप्रकारे बंदोबस्त मांडिले. चिजीत सौभाग्यवती बगाबाई आणविली तर तिकडून अवघी महिना पंधरा निकर आणावयाची आहेत. मग तातड काय ? सेवेसी. हे विनंति. [२९१] ॥ श्री॥ तीर्थस्वरूप राजश्री दादा वडिलांचे सेवेसीः आपत्ये हरीने साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल , शुद्ध द्वादशी जाणून स्वकीय लेखन आज्ञा केली पाहिजे. पर आले त्याजबरोबर राजश्वी त्रिंबकपंत कारकून तेथे आहे त्या पाहिजे. पुण्याहून माणूस हे त्याच पत्र आले.