पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/517

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

याचा नेमिला होता तो राहिलासा जाला आहे. श्रीमंत राजश्री दादांचे व गोपिकाबाईंचे मते ताराबाईचे विचारें जो राजा बसवावयाचा अगर न बसवावयाचा विचार जो करितील त्या॥ ताराबाईचे विचार करावें. त्यास रामराजाच बाहेर काढावा असें असे. श्रीमंत राजश्री माधवराव उद्यांच्या सोमवारी सातारियास जाणार. सप्तमीस पेशवाईची वस्त्रे घ्यावयाचा मुहूर्त आहे. राजश्री त्रिंबकरावमामा व शामरावबाबा व विसाजी दादाजी तिघे सातारा आहेत. राजा बाहेर काढावा, क-हाड वाई प्रांत त्याजकडे द्यावा, असेंहि करतां न ऐकत तरी जसा कळेल तसा बंदोबस्त करावा. परंतु, आधी वस्त्रे द्यावी. मग मजकूर जो करणे तो करावा. सांप्रत मुख्यत्वें मुखारामपंत व बाबूराव फडणीस हे दोघे एक विचारे आहेत. असे आहे. राजश्री दादासाहेबांपाशी पेश रामचंद्र गणेश व कृष्णराव काळे या दोघांची चाल बहुत आहे. आबा पुरंधरे व नाना पुरंधरे हेहि आहेत. पुढे कसकसा मजकूर होईल तो लेहून पाठवीन. तमाम शिलेदारांस पत्रे पाठविली आहेत. समजाविशी करून, नालबंदी देऊन, फौज जमा करावी असें आहे. अशीहि बोली आहे की श्रावण शुद्ध प्रतिपदेस डेरादाखल व्हावें. श्रीमंत राजश्री माधवरायांनी वस्त्रे घेऊन सातारियाचा बंदोबस्त करून पुणियास यावें. मग बाहेर स्वारीस निघावें. राजश्री माधवरायांनी घरी देशी दहा हजार फौजेनसी असावें, दादांनी स्वारीस जावें, असें आहे. जागाजागा विचार होतच आहेत. पुढे कसकसे होईल ते लेहून पाठवितों. हे विनंति. [२९० ] • ॥ श्री ।। ४ जुलै १७६१. . वाडलाच सेवेसी सा।। नमस्कार विनंति येथील क्षेम त॥छ १ जिल्हेज पावेतों आशीर्वादंकरून पुणंत सुखरूप असो. आपण (पत्र ) पाठविले की