पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/516

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ २८९] ॥ श्री॥ ४ जुलै १७६१.. वडिलाचे सेवेसी साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम त॥ छ २९ जिलकादपावेतों आशीर्वादेंकरून पुणेत सुखरूप असो. आपण पत्र पाठविलें तें पावलें. तीर्थरूप नाना ज्येष्ठ वद्य त्रयोदशीस पुणेस आले. तीर्थरूप बाबांस बरे वाटत नव्हते. याजकरितां मी तुळापुरी गेलो होतो. तिकडून तीर्थरूपहि आले. मग बाबांस घेऊन पुणेस अवघे समागमेंच आलो. आपण उभयतां तीर्थरूपास पत्रे पाठविली ती प्रविष्ट करावी ह्मणवून आज्ञा. आज्ञेप्रे॥ दिली. मुलेंमाणसें तिकडे आहेत त्यांचा मजकूर आपण लिहिला. त्यास, तीर्थरूप नानांच्या विचारें आठचार दिवस गलबल करूं नये. तुझी येथे याल त्याउपरि आणावयाची तजवीज करावी लागेल. सारांश, तिकडून इकडे आणावी लागतील यांत तो गुंता नाही. परंतु नेहमी तिकडे होती याजकरितां तुर्त गलबल आधीच करतां नये. यामें॥ बोलले. त्यांचे हातचें उत्तर सकाळ रवाना करतो. भावगर्भ बोलल्याचा लिहिला. सांप्रत उभयतां आमत सातारेस जातात. मंगळवारी पुणेहून निघोन जातात. आण दहा बारा दिवसांची दानें वगैरे. नेहमी तेथे जाऊन समीप असावे लागेल. त्याजकरितां तपशील ल्याहावयास ठीक पडले नाही. सकाळ सर्व तपशील लिहून पाठवितों. स्वारीसमागमेंहि मजला जावे लागते. तुर्त दहा दिवसापासून तेरावा चवदावा दिवस होईतोपर्यंत नेहमी तेथून लिहितां नये. स्वारीहि लवकर निघणार. तीहि गडबड सांगातेंच जाहाली. सारांश, आपण तेथे फार दिवस राहं नये. लवकर यावे. दिवस राहावयाचे नाहीत. तुह्मा येथें आल्याउपरि प्रकार सर्व नजरेस पडेल. त्या डौलावर कराल. पास्तव जरूर यावें. श्रीमंतांचा आजचा बारांवा दिवस आहे. दानधर्म उत्तम कार दाने वगैरे होतच आहेत. राजश्री माधवराव क्रिया करितात. तेरावा वसहि उत्तम होईल. श्रीमंत राजश्री माधवराव सातारियास जाणार. एक पार, एकटेच जाणार. एक विचार. दादाहि बराबरीच जातील. मुत्सदी विष बरोबर सातारा जातील. श्रीमंत राजश्री नानासाहेबी राजा कराव ५०