पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/515

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३९२ येथून कोठे गाजीपुराकडे अगर गढीस लागावास फौज पाठवितां नये. सागराकडेहि मोठा दंगा जाहला होता. हटे, सागर, जटाशंकर, जयसिंगनगर, खेमलासे, येरण, दुरई इतकी मात्र ठाणी राहिली. वरकड सर्व जागा गेली. राजे पिर्थीसिंग गढ़ाकोटावाले देखील फिरले. सागर खाली करून मागों लागले. झुंजहि जाहले. तेथें अपाजी विश्वनाथ सागरचे लिहिणार कामास आले. किल्याबाहेर माणूस निघतां नये. हटयास मोर्चे लागले. एक महिना किल्ला जुजला. शेवटी त्याणी तळे फोडले. एक दोन रोजी हटे, जटाशंकर किल्ले जावे असा प्रकार जाहला. तेव्हां राजश्री विसाजी गोविंद याणी राजश्री जानोजी भोसले यांजकडे कारकून पाठवून त्यांस आणिलें. दहा हजार फौज जानोजीबाबाच आले. हटयाचे मोरच्यांवर जूजहि त्यांसी व बुंदेल्याचे लोक व डांगी, गोंड तमाम दहा हजार जमा जाहले होते. पांच सातशे माणूस कापून काढिले, तेव्हां मोरचे सोडून निघोन गेले. जागा सर्व लुटून जाळून फडशा केली. बुंधेल्यांशीहि सलूख तूर्त केला. तेजगड वगैरे ठाणी लोध्यांकडे राहिली आहेत, ती तूर्त येतां दिसत नाहीत. परंतु ते या बंडांतून निघोन दंगा करतील यास्तव तूर्त सलूख करून घेऊन मग राजश्री जानोजीबावांची रवानगी करतील. तेहि नागपुराकडे जाणार. हिंदुस्थानांत कोणीहि राहत नाही. रोहिल्याची फौज फिरोन आली. सकराबादचे ठाण उठवून दिले. ते देवलीस आलें. फिरोन दंगा जाहला रालांतील मात्र नाही. चोहीकडे दंगा याउपरि भार ईश्वरावर आहे. राजश्री गंगाधरपंततात्या जाटापाशी आहेत. गाजदीखानास वजिरी जाटानें देविली. तेहि बरोबरच आहेत. तात्याबरोबर फौज ह्मणावी तर हजार दीड हजार भादेत राजश्री गणेश संभाजी बुंदेलखंडांत आहेत. त्यांचा एक राऊत येत नाही. आह्नीं तूर्त अहमदखानाशी सलुख केला आहे, परंतु नाम नाही. जाटानें आगन्यास मोर्चे लाविले, परंतु किल्ला मज त्याचे सार्थक होतां दिसत नाही. पन्नास हजार पाऊण लक्षपर्यंत मोर्चास आहेत. शहर घतल. मार्च बसले आहेत. हे विनंति.