पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/514

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ २८८] ॥श्री॥ २७ जून १७६१. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंत स्वामीचे मेवेसिः पोष्य बाळाजी गोविंद व गंगाधर गोविंद सा॥ नमस्कार विनति उपरि येथील कुशल ता॥ जेष्ठ व॥ ८ पर्यंत यथास्थित जाणून स्वकीय लिहिले पाहिजे. विशेष. या प्रांतीचें वर्तमान सविस्तर आपणास एक दोन पत्रीं लिहिले, त्याजवरून कळलेच असेल. आह्मी अंतरवेदीत आल्यानंतर सर्व ठाणी सरकारची कायम झाली. मंगळपुरास अहमदखान बंगस याजकडील फौज होती, तेथे थोडें बहुत झूज जाहले. तसेंच फफूंदेस रोहिले इटावे सकुराबादचे फफूंद तालगाव मिळोन अमलदार जमा होऊन हजार बाराशें राऊत, दोन हजार प्यादे एक जागा जमा जाहले होते. आठ दहा रोज झुंजले, शेवटी निघोन गेले. इटावे, सकुराबादसुद्धा ठाणीं त्यांनी खाली करून दिली. वरकड सर्व ठाणी सलुखानेंच खाली जाहली. एक गाजीपुरी रूपराय खीचर व कीरतसिंग राहिले. त्याणी तेथे मातबर सरंजाम करून किल्यांत बसले आहेत, यामुळे तिकडील महाली अमळ सुरळीत चालत नाही. कृष्णाजी रायाजी, काशी गंगाधर, ' गंगाधर बापूजी वगैरे सव गाजीपूरचे शहावर सातशें राऊत, तीन अडीच हजारपर्यंत प्यादा जमा करून आहेत. ठाणी मात्र बसली आहेत. परंतु खीचराचे दहशतीमुळे जमादार भेटत नाहीं अमल चालत नाही. मल्ला तो राहिला नाही. माल खाऊन जमीदार बसले, त्याचे काय करावे ? फफूंदेस कुसळसिंग हमनाथ व पंचमसिंग चोबे वगैरे पहिल्याप्रमाणे जमीदारा जाहला. बलोरुरु आदिकरून गढ्या पूर्ववत् जाहल्या. फुफुद कसब्यांत मात्र ठाणे बसले आहे. तसेच इटावेयाचे चौधरी गढीबंद जाहले. माल सर्व भाक्षला. पैसा घेऊन कांहीं रोहिल्यां दिला. काही आपण घेतला. एवंच रयतेकडे काही राहिले नाही. गढीबंद होऊन बसले आहेत. काही दबाव करावा तर कामेथीस पळून जाणार. रोहिल्यांच्या फौजा गंगातीराने आहेत. यामुळे आमांस ३३० हे पत्र पानिपतानंतरच्या गडबडीचे आहे.