पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/513

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विले. त्यावरून गारदी याजवर बहुत मेहेरबान झाले, आणि आंगन्यावर आणखी चौकी मजबूत गारदियाची ठेवून बंदोबस्ती केली. आणखी जीवनराव वकील याणे मोगलास पत्रे पाठविली होती ती धरली, की तुझीं या वेळेस येऊन पोहोचणे. त्यावरून त्याची अप्रतिष्ठा केली. परंतु कोण्ही देखिली नाही. जनआफवा आहे. अस्तु. प्रस्तुत कामकाज कुल यावत्यारी ॥ ॥ बाबूराव फडणीस व ॥ सखारामबापू हे दोघेजण आहेत. यांजवेगळे काडीमात्र कामकाज होत नाही. श्रीमंत दादासाहेब चौदावे दिवशीं सोमवारचे बारा घटका रात्री वाड्यामध्ये मुहूर्त करून दाखल झाले. तोपयंत पर्वतीस होते. श्रीमंत माधोराव व बाईसाहेब बुधवारी दाखल होणार. पर्वतीस आहेत. पुढे मानस हा आहे की साता-यास जाऊन ताराबाईचे विद्यमाने राजापासून पांघरुण घ्यावी, व नवे शिक्के करावे, मग पुढे राज्याचा जो बंदोबस्त करायाचा तो करावा. जर ताराबाईने आपले खुशीनें राजापासून पांघरुणे दिली तर उत्तमच आहे. नाहीतर आपला आपणच कार्यभाग संपादून सत्वरच यावें, ऐसा निश्चय आहे. मंगळवारी जेजुरीचा मुकाम होता. पुढे राजश्री चिटकोपंतनाना साहित्यास सोमवारचे रात्री पुढे स्वार होऊन गेले, तो मागे फिरून मनसुबा राहिला. चार दिवस मुकाम झाला. चौ दिवसा करार जातील. सारांश कारभार उभयतांकडे आहे. प्रस्तुत मुलकाची बंदोबस्ती यथास्थित करावी. मग महाल वगैरेचे हिशेब मखलाशी ज्या होणार त्या होतील. [२८७] १ मार्च १७६०. ढोले व पारखी काबे पुणे यांचा होळीचे पोळीचा कजिया आहे. सबब. सरकारचा प्यादा देऊन पोळी लावावी हाणोन परवानगी श्रीमंत राजश्री नानांची. रवानगी राघोपंत गडनाले सुभानजी एसाळ दि॥ बहीरजी नाईक मारे याजब॥ जाली. छ १३ रजब, इहिदे, फाल्गुन शु॥ १५.