पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/512

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धरतात्या मात्र आहेत. मथुरेजवळ उतरून अंतरवेदीत आले ह्मणोन खबर आहे. काय होईल तें पहावें. सेवेसि श्रुत होय. हे विज्ञापना.. [२८६] ॥ श्री। ६ जुलै १७६१. स्वामींचे सेवेसी सेवक त्रिंबक बाबूराव साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करावयास आज्ञा केली पाहिजे. विशेष. पीरखानाबरोबर पत्र पाठविलें तें पावलें. बारा हजारांच्या हुंड्यांचा ऐवज गणेशपंतास पाववून जाब पाठविला आहे. आह्मांबरोबर हुंडी. सहा हजारांची तेहि सकारली व नक्षा रुपये वीस हजार त्याची याद अलाहिदा आहे. यावर दरबारचे वर्तमान. श्रीमंतांस देवआज्ञा झाली हे तों जगप्रसिद्ध कळलेच असेल. मरणाचे पूर्वी दोन दिवस पर्वतीसच होते. तेथेंच मृत्यु आला. तेथें मृत्यु होतांच शहरची बंदोबस्ती केली. जागा जागा दहा दहा वीस गाडद्यांच्या चौक्या ठेवून वाड्याभोंवते हजार बाराशें गाडदी चवकी ठेवून बंदोबस्ती केली. मंगळवारचे दिडा प्रहरा रात्रीस. दुसरे दिवशी बुधवारी अग्नि दिला. परंतु ते दिवशी शहरांत मोठा आकांत झाला. ईश्वरजीस करणे की तशामध्ये कोण्ही परसैन्य नव्हते; नाहीतर. मोठा प्रळय झाला असता. इतके असतां जो आंगल्या कैदेमध्ये आहे, त्याणे इभ्राहिमखां गारदी याचा भाचा चाकरीचे उमेदगारीमुळे सात आठ हजार गारद्यांनिशी आला आहे, त्याणे श्रीमंत सावध असतांच पैगाम केला होता की याचा काळ होतांच तं व आपण मिळन शहर लुटावें, आणि गर्दी करावी. ऐसा पैगाम होतांच तो इकडे काल होयास ( झालें). आणि आंगन्याने त्यास पत्र पाठविलें की आतां हे वेळ आहे. गारदी व ती यऊन पाहोचणे. त्याने तें पत्र बजिन्नस नेऊन श्रीमंत दादासाहेबांस बात ३२९ तुळाजी आंग्रे याला १७५६ त कैदेत टाकले.