पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/511

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर्तमान तागाईत जेष्ठ व॥ ५ मिती हिंदुस्थानी स्वामीचे कृपावलोकनेकरून सेवकाचे यथास्थित असे. विशेष. स्वामीनी आज्ञापत्र पाठविलें तें चैत्र शु॥ १४ श्री काशीत पावले. त्याजवरी वैशाख व॥ ५ पंचमीस निघालों ते अयोध्येकडून ब्रह्मावर्तास आलों, तों तेथें अमल होऊन आठ दिवस झाले होते. तेथून वैशाख शु॥ ११ गुरुवारी उंबरगडास दाखल झालो. आपले मंडळीची व श्रीमंत राजश्री बाबांची भेट झाली. माणसें श्रींतच ठेविली. सडे एक माणूस व तट्ट असे आलो. सोबती काशीकर ब्राह्मण पांच सात होते, ह्मणून मार्गी निभाव झाला. अंतरवेदीत बहुतकरून अमल बसला आहे. कड्याकडे अद्यापि दंगा आहे. फर्काबादेपलीकडे रोहिल्यांची फौज आली आहे. ह्मणून वर्तमान आहे. व जाट व गंगोबातात्या मथुरेजवळ उतरून कौलास आले हेहि वर्तमान आहे. नवाब सुज्यातदौला काशीस दाखल झाला. शहाजादाहि पाटणियाहून दोन मजली आलीकडे आला आहे. सुजातदोले व त्याची भेट होणार. त्यास, त्यांजमध्ये कांहीं विषम पडले. ह्मणून वर्तमान आहे की मिरजाकोचक पूर्वी प्रयागीं होता तो शहाजादा याजकडे गेला होता. त्याजवरी सुज्यातदौला याने तो तिकडे गेलियावर प्रयाग घेऊन त्याची माणसें धरली, ह्मणून तो शहाजाद्यापासून अयोध्येस आला. त्याजलाहि धरून बंदीस घातले. त्यास हल्ली दिल्लीकडून आलियावरी त्यास जिवें मारिला. त्याची मुलें बायका अशी सातजण मारून टाकली. याकरितां शहाजादा यास विषाद आला आहे. पुढे जें होईल ते होवो. आज तागाईत राजकीय वर्तमान या प्रांतीं ये रीतीचें आहे. राजश्री मल्हारराव होळकर सुभेदार माघारे फिरले, ह्मणून वर्तमान आहे. जानोजी भोंसले सागर प्रांतास आले होते, तेहि मल्हारवा देशास गेले असें वर्तमान ऐकून नागपुराकडे गेले. बुंधेले यांचा सला मात्र करून देऊन गेला. सल्याचा करार करून हिंदुपतराजे यानी बाळाजीपंतास पत्र लिहन दिले की तुमचा व आमचा पूर्ववत् प्रमाणे सलख. कळावें. गुरसराई व कोच या प्रांतीं गव्हारांनी दगा केला आहे. तूर्त या प्रांती गंगा