पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/510

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रुपयांची वरात तुह्मावरी दिली. त्यास तुह्मीं वरातेचा ऐवज अद्याप दिला नाहीं, ह्मणून हुजूर विदित झाले. त्याजवरून हे पत्र लिहिले असे. तरी वरातये॥ ऐवज मशारनिल्हेस पत्रदर्शनी पावता करणे. येविषयी फिरोन बोभाट येऊ न देणे. जाणिजे. छ ३० रमजान सु॥ सन इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [ २८४] ॥श्री॥ २१ मे १७६१. आशीर्वाद उपरि. चवेताळीसशा रुपयांच्या चिठ्या बाबूरायाच्या घेऊन पुणियास रवाना करितों. तुमची पत्रे चिटकोबाकडे रवाना करितों. पत्रा॥ ऐवज देतील. श्रीमंतांचे पत्र पाठविलें तें पावलें. तुर्त आह्मी रेवातीरी आहों. श्रीमंत बहाणपुरी गेले. सौभाग्यवती गोपिकाबाई येथे राहिली आहेत. नारायणराँयास फोड्या आल्या. आठाचौ रोजांनी येथून गेलियावर वर्तमान निवेदन करूं, तो तुमीहि याल. वरकड सविस्तर मजकूर कळला. त्या अलीकडील पत्र तुह्मीं चैत्र शुद्ध १ निघतों ह्मणऊन लि। तें उत्तम. त्याप्र॥ निघोन आलांच असाल. सत्वर भेटी होईल. हे आशीर्वाद. कारकुनांची पत्रे पाठविली ते पुणियास चिटकोबा ज्यांची त्यांस पावितील. हे आशीर्वाद. मित्ती चैत्र व॥ २ द्वितीया, शके १६८३ वृषनाम संवत्सरे.हे आशीर्वाद. [२८५] ॥श्री॥ २४ जून १७६१. सेवेसि जोती गोपौळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना येथील ३२७ नारायणरावास देवी आल्याचा उल्लेख नानाफडणिसाने आपल्या आत्मचरित्रांत केला आहे ( पत्रे व यादी ५३ ). ३२८ हे पत्र पानिपतानंतर अंतर्वेदीत व बुंदेल संडांत झालेल्या गडबडीसंबंधाचे आहे.