पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/509

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांस सुटणार नाही. ऐक्य परमार्थ राखून देतील, तर घेऊ ; नाही तर श्रीमंतांसमक्षहि ते देतील व आह्मी घेऊ. परंतु या समयी आह्मी ऐवज दिल्याने उपकारी होतो व पूर्वापर स्नेह वृद्धिंगत होतो. इतकें लक्षून कार्य करून घ्यावें हेच उचित आहे. सांप्रत सरदारांनी ताकीदपत्रे दिली ती पाठविली आहेत. त्याप्रमाणे ऐवज निश्चयानरूप ऐवजाचा निकाल करून पांडुरंग शंकर यांच्या ऐवजासुद्धां रवानगी करावी. तुहीं चार लक्ष विसाचा ऐवज झाडा दिल्लीत लिहून दिला. परे त्याबरोबर ऐवज पांचशे रुपये तुह्माकडे नक्षा आला तो जमेस न धरिला. याजमुळे पांचशे हिशेबी बाकी व ऐवम झाड्यापैकी आठ आणे येतां पांचशे अर्धा रुपया हिशेनाची नकल पाठविली आहे. त्याप्रमाणे मनास आणून ऐवज राजश्री पांडुरंग शंकर यांचे स्वाधीन करावा. आहींहि बाबांस बहुत प्रकारे लिहिले आहे, आपणहि समजून सांगावें. त्यांचे तुमचे सर्वांचे विचारास आलिया कराराप्रमाणे लक्षा रुपयांचा निकाल करून द्यावा. कदाचित् ऐवज नच द्यावा अमें सर्वांचे चित्तास आले, तर आमाकडील दस्ताऐवजी कागदपत्र सर्व देऊन श्रीमंतास पत्र देऊन राजश्री पांडुरंग शंकर यांची रवानगी सत्वर आमाकडे करावी. विलंब न करावा. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [२८३] ॥श्री॥ ६ मे १७६१. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद स्वामी गोसावी यांसिः पोण्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणे. विशेष. चिरंजीव राजश्री भाऊसाहेब यांनी राजश्री नारो शंकर यांस गुदस्ताचे समजाविशीचे ऐवजी एक लक्ष .३२५ पर ह्मणजे परंतु. पर हा शब्द कन्हाडे लोकांच्या बोलण्यांत विशेष येतो. ३२६ वडिलांचा कित्ता चिरंजीवांनी गिरविला होता.