पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ कुलबादशाही अथवा मराठपदबादशाही व दुसरीस भटकुलबांदशाही किंवा ब्राह्मणपदवादशाही पटल्यास चालेल. नांव पाहिजेल तें द्या. वस्तुस्थिति ध्यानांत आली ह्मणजे झाले. महाराष्ट्रधर्म व महाराष्ट्रराज्य जिकडे तिकडे करण्याचा प्रयत्न ह्या काली मराठ्यांचा चालला होता. प्रसंगोपात्त ह्या प्रयत्नाचा पुढाकार कधी महाराष्ट्रांतील मराठ्यांनी व कधीं महाराष्ट्रांतील ब्राह्मणांनी केला. हेतु पाहिला तर दोघांचाहि एकच होता. महाराष्ट्रांतील मराठ्यांनी व ब्राह्मणांनी दोघांनी मिळून महाराष्ट्रधर्माचा व राज्याचा प्रसार करण्याचे काम चालविलें होते. ह्या कामी येणाऱ्या यशापयशाचा वांटा ह्या दोघांनाहि सारखा घ्यावा लागे. इ.स. १६४६ पासून १६८० पर्यंत शिवाजीच्या पुढाराखाली मराठ्यांस उत्तरोत्तर यशच येत गेलें.१६८९ पासून १७०७ पर्यंत मराठ्यांना अवरंगजेबाशी लढावे लागले. शिवाजीच्या वेळी आलेल्या संपत्ती व त्याच्या पश्चात् आलेल्या विपत्तीचे वांटेकरी ब्राह्मण व मराठे हे दोघेहि झाले. त्या मरणप्राय संकटांतून निघून मराठ्यांनी पेशव्यांच्या पुढारपणाखाली समुद्रवलयांकित पृथ्वीचें सार्वभौमत्व मिळविण्याचा सुमुहूर्त १७६० च्या सुमारास आणिला. परंतु १७६१ साली अबदालीशी युद्ध होऊन मराठ्यांचा कधीहि झाला नव्हता असा पराभव पानिपत येथे झाला. ह्याहि गंडांतरांतून निभावून थोडक्याच कालांत त्यांनी आपली पूर्वीची सत्ता बहुतेक कायम केली; परंतु, पूर्वीची भट्टी जी ह्यावेळी बिघडली ती पुनः कधी नीट सावरतां आली नाही. १७६० त सर्व हिंदुस्थानाला ह्मणजे उत्तरेस मुलतान, लाहोर, ठठा, भकर, रोहिलखंड,अंतर्वेद, काशी, प्रयाग, अयोध्या व बंगाला; दक्षिणेस श्रीरंगपट्टण, तंजावर व रामेश्वर आणि पूर्वेस तैलंगण व पूर्वसमुद्र इतक्या प्रदेशांवर मराठ्यांची सत्ता कायम करावयाची असा सदाशिवरावभाऊचा व बाळाजी बाजीरावाचा वेत होता. परंतु १७६१ नंतर पश्चिमोत्तरेकडील मुलतान लाहोर, ठठा, भकर व पूर्वोत्तरेकडील प्रयाग, अयोध्या व बंगाला ; दक्षिणेकडील श्रीरंगपट्टण व रामेश्वर व पूर्वेकडील तैलंगण व पूर्वसमद्र, हे प्रांत मराठ्यांच्या ताब्यांत पुढे कधीच आले नाहीत. १७६० पर्यंत मराठ्यांचे पाऊल एकसा. रिखें पुढें पडत चालले होतें तें १७६१ पासून यमुना व तुंगभद्रा ह्या दोन नद्यांच्या आत आले. हे जे आंत पाऊल आलें हीच पानिपत येथील पराभव केवढा भयंकर होता ह्याची उत्तम साक्ष आहे. प्रस्तुतच्या विवेचनांत ह्या पराभवाचा विचार करावयाचा आहे. पानिपत येथील पराभवाची अनेकांनी अनेक कारणे कल्पिली आहेत त्यांपैकी मुख्य मख्य कारणांचा येथे निर्देश करितो व त्यांपैकी खरी कारणे कोणती ह्याचा उलगडा ह्या ग्रंथांत व इतरत्र छापिलेल्या पत्रांच्या साहाय्याने होईल तितका करून दाखवितों. (१) पेशव्यांनी छत्रपतींची सत्ता संपुष्टांत आणिल्यामुळे स्वामिद्रोहाच्या पापाने पेशव्यांचा क्षय झाला. (२) छत्रपतींची सत्ता संपुष्टांत आणिल्यामुळे मराठा व वाह्मण सरदारांची मने पेशव्यांविषयी कलुषित झाली.