पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/508

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८५ बाकी रुपये. २३,८७५॥. वजा केले ते रु॥ ६८०० बाकी रुपये. (१७०७५॥ पैकी वजा महीपतराव चिटणीस याजबा.२०००. बाकी १५०७६॥. छ २३ जमादिलाखर मु॥ भिंड. येणेप्र॥ नारो शंकर याजकडे याद लेहन दिल्ही असे. [ २८२7 ॥श्री॥ २३ फेब्रुवारी १७६१. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंत दाजी स्वामीचे सेवेसिः पोण्य नारो शंकर साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल छ १७ रजब पावेतों मु॥ ग्वालेर यथास्थित जाणोन स्वकीय लेखन करून तोषवीत असावें. यानंतर राजश्री पांडुरंग शंकर यांचे लिहिल्यावरून आपण आमचे ऐवजाचे द्यावयाविषयी ज्या ज्या प्रकारे राजश्री बाळाजीपंत बाबा यांसि बोलिलेत त्या कृपेचा सायंत अर्थ कळोन बहुत समाधान झालें. ऐसाच आपला स्नेह अकृत्रिमभाव आझांसी आहे. चित्तास चित्त साक्ष साक्ष असे. ऐसियासि राजश्री बाबा यानी निश्चयास अंतर करावें, उचित नव्हे. भगवत् कृपेंकरून श्रीमंतांचे राज्य कायम आहे. आजच कोण्ही हितोपदेशी सांगत असतील त्याजवर दृष्ट देऊन, तरते बुडते पाहून, आत्मस्वार्थ ध्यानात आणून, बाबानी आमचा ऐवज कैलासवासी पंतानी करार केला त्या वचनावर दृष्टि न देतां न द्यावा, व हिलेहवाले करावे व ते भिंडेंत वचन बोलिले तें अनत करावें, विहित नाही. शेवट आमचा ऐवज ४९