पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/501

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पंतांच्या फौजेनें शिकस्त खाऊन पळाली. मशारनिल्हे झुंजांत राहिले ह्मणोन वर्तमान येथे आले. बाळाजी गोविंद फौजेसमागमें गेले. ते व सारी साकल्य कळलेच असेल. त्या आलीकडील मजकूर तरी, यांणी तोफखान्याचा आरब पस रून खंदक खणून पाणिपत गांव आपल्या पाठीशी घालून सड्या फौजा तोफांचे मागे उभ्या याप्रमाणे बंदोबस्ताने राहिले आहेत. बुणगे गांवाचे पुढे फौजेचे मागे ठेविले आहे. नित्य गोळागोळी होती; सभोंवत्या त्याच्या फौजा आहेत. त्यापाशीही चाळीस पन्नास तोफ चांगली आहे. साठहजारपर्यंत फौज आहे. एके दिवशी सरदारांकडील बाजूकडे त्याची फौज वाढून आली. त्याची यांची लढाई चांगली झाली. शिंद्यांकडील लोकांनी त्यांना गोटांत नेऊन घातले. साहाशे पावेतों माणूस जखमी व ठार त्यांजकडील जाहाले. यांजकडीलहि दोन अडीचशेपर्यंत ठार व जखमी झाले. अस्तमान झाले यास्तव लढाई राहिली. त्यानंतर पंधरा दिवशी चंद्र २८ रविलाखरी श्रीमंताकडील मोर्चावर चालून चार पांच हजार आले. वरकड फौज त्यांची पाठीमागेच उभी होती. त्यांची यांची लढाई होऊ लागली. लढाईस प्रारंभ होतांच अस्तमान झाले. ते दिवशी बळवंतराव गणपत यांस छातींत गोळी लागली. तसेच घोड्याखाली पडले. तो त्यांजकडील माणसें धांवली. त्यांतील एकाने तोंडावर तरवारीचा वार केला, दुसऱ्याने गळा कापून तें शीर नेऊं लागले, तो पांच सांत राऊत धांऊन सोडविले. गळा अर्धा कापला होता, तसेच आणून दहन केले. समागमें स्त्री अग्निप्रवेश केली. त्यादिवशी त्याजकडील दीड हजार माणूस ठार आपल्या आराव्यापुढे पडले होते. त्यांचे पुढे किती होते हे कळलेच नाही. औशीची तीन घटका रात्र पावेतों लढाई झाली. आपल्याकडील दीडशे पावेतों ठार व पांचशे सातशे पावेतों जखमी झाले. ही लढाई फार चांगली झाली होती. परंतु वळवंतराव यांचा प्रकार असा झाला यामुळे ते सर झाले. त्यावर गोविंद बल्लाळ यांस पूर्वीपासून पत्रे जात होती की अंतरवेदीत उतरून, अवदालीचा रस्ता बंद करणे. यावरून, ते दरमजल दिल्लीच्या सुमारे आले. तेथील नारो शंकर यांचीहि कांहीं फौज मदतीस घेतली व पुढे रस्त मारावी तों अबदालीने दाहा हजार फौज निवडक पाठवून दगा केला. कोणी लढले व कोणी पळाले. गोविंद बल्लाळ यांचे शीर कापून आणून श्रीमंताकडे पाठवून दिल्हें. मग दहन झाले. गोविंदपंताकडील वगैरे तीन चारशे फौज ठार झाली. गोविंदपंताचे चिरंजीव वाळाजी गोविंद हे समागमें होते. ते पळून नारो शंकर यांजवळ दिल्लीस आले. कोणी कोणी पळालेले लोक येत. “याप्रमाणे झाले. मोठे दगेबाज, याजकरितांच आरव पसरून खंदक खणून मोंगलाई रीतीने राहिले आहेत. दोन महिने यांची लढाई होत्ये. अद्यापि लढावें हाच निश्चय उभयतां पक्षी झाला आहे. इश्वर काय परिणाम लावील तो खरा. मनसवा भारी पडला आहे. पैसा नाही. माहागाई फार. यामुळे लष्कर गलबलले आहे. याप्रमाणे वर्तमान आहे. आपले बुणग्यांत गोळे जातात. त्याची बहूत पत्रे मी पाठविली. परंतु