पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/502

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फौज कोठे एके जागा होईल ते लिहिले आलियानंतर कळेल. ते एके जागा होऊन दिल्लीस येतील. त्यास गोविंदपंत राहिले हे वर्तमान तिकडे कळल्यानंतर मामल्यांत जमीदार वगैरे फिसाद करितील. तर तुझी सावधपणे राहून, शिबंदी अधिक उणी लागली तर ठेवन, कोठे फिसाद न होतां, पूर्ववत्प्रमाणे बंदोबस्त राहे तें करणे. मशारनिल्हेचे पदरी मातबर शिवराम गोविंद वगैरे आहेत, त्यांचे समाधान राखोन सर्वा गोष्टींचा बंदोबस्त करणे. मोगलाकडील कोणी दहा पाच हजार फौज घेऊन येऊन तीकडील अमल करितो असें नाही. परंतु इकडील गोविंदपंतांच्या वर्तमानानें तीकडील जमीदार चार आहेत ते तूर्त डोई उचलितील, दंगा करितील, ठाण्यास दगा करितील. यास्तव मजबुदीने राहून ठाणियांत जे जे आहेत, त्याचा पुस्तपन्हा वरचेवर करून ठाणी मजबूत रहात तें करणे. कदाचित् वसुलास जमीदारांनी चार दिवस खलेल केलिया पढे सर्व नीट केले जाईल. परंतु ठाण्यास दगा जालियाने वाईट. यास्तव ठाणी सर्व फार हिमतीने राखणे, तुझी तिकडे आहां. गोविंदपंतांनी मातबर शिवराम गोविंदासारखे पदरी बाळगले आहेत. त्यास हिमत धरून अशा समयांत गेली गोष्ट सुधारून दाखवावी. झाले गोष्टीचा खेद न करावा. ईश्वर इच्छेस उपाय नाही. तुझी आपले सर्व प्रकारे समाधान असों देणे, बंदोबस्त उत्तम प्रकारे करणे. इकडील फौज शिकस्त खाऊन तिकडे गेलियाने फारच वाईट दिसते. यास्तव त्यास तिकडे जाणे उत्तम नाही. त्याणी जमा होऊन मागती दिल्लीम यावे. याप्रमाणे येथून त्यांस लिहिले आहे. तुही त्यास याप्रमाणे लिहून ते दिल्लीसच गेट तें करणे. त्यामागे तुही सर्वांनी हिंमत धरावी. मामल्यांत बंदोबस्त उत्तम आपणास एकहि लिहावयास अनुकुल न पडले. बरें! असो. बहुत काय लिहिणे. लोभ कीजे. हे आशीर्वाद. हें वर्तमान तीर्थस्वरूप राजश्री बाबांस लिहून पाठवावें. हे आशीर्वाद. पेटा फुलमरी एथील फडनविशी माहादाजीपंत कुंटे यांस दिल्ही आहे. त्यांस त्यांचे वेतन उत्तम प्रकारे होय, अशी विनंति श्रीमंतास करून करून घ्यावे. मी आपणास लिहावे असे नाही. असामी आपले घरचा. परंतु माहादाजीपंत यांची पत्रे येतात त्यावरून लिहिले आहे. हे आशीर्वाद. ४८